कु.अनिशा  कांबळे याचे सीबीएसई परीक्षेत उज्वल यश 


 औसा प्रतिनिधी 
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ तथा सीबीएसई सन 2022-23 इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल दि. 12 मे रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला त्यात धनगर गल्ली,औसा येथील कु.अनिशा सदाशिव कांबळे हिने 97.20% गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे मराठी विषयात शंभर पैकी शंभर गुण प्राप्त केले आहेत. ती पोदार इंटरनॅशनल स्कूल लातूरची विद्यार्थिनी आहे. तिच्या या यशाबद्दल आई वडील, नातेवाईक व मित्र परिवाराकडून कौतुक केले जात आहे.
कुमारी अनिशा कांबळे च्या उज्वल यशाबद्दल श्री विरभद्रेश्वर प्रशालेचे मुख्याध्यापक शिवकुमार मुर्गे सर्व शिक्षक स्टाफ तसेच सामाजिक कार्यकर्ते राम कांबळे बाळासाहेब कांबळे सहशिक्षक विकास कांबळे व्यंकटराव म्हेत्रे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments