हासेगाव डी फार्मसी  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे निरोप समारंभ  
औसा (प्रतिनिधी ) 
श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित ,लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव  महाविद्यालयांमध्ये द्वितीय वर्गाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला.  या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले  संस्थेचे ,सचिव श्री वेताळेश्वर बावगे  ,कोषाध्यक्ष श्री शिवलिंगी  जेवळे, प्राचार्या श्यामलीला बावगे (जेवळे) , मुख्यादापक कालिदास गोरे मान्यवर मंचावर  उपस्थित होते.  या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांचा सत्कार   विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात  आले,  
       भोसले बाळकृष्ण आणि शाहूराज कदम या डी फार्मसी विध्यार्थ्यानी महाविद्यालयात  प्राचार्या मॅडम केलेले  सहकार्य महाविद्यालयात आलेले शैक्षणिक अनुभव व्यक्त केले.                  औषधनिर्माण शास्त्राची  खूप मोठी  व्यापी आहे  यात विद्यार्थ्यांचं करियर आहे ,खूप  मोठी संधी आहे आणि या संधीच सोनं आपल्या विध्यार्थ्यानी करावं असे प्रतिपादन   प्राचार्या  डॉ श्यामलीला बावगे (जेवळे) यांनी केले. आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना   पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.                     लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी ,हासेगाव , राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज   , लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था  , गुरुनाथ  अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल  , लातूर कॉलेज ऑफ सायन्स,  लातूर ,लातूर कॉलेज ऑफ फार्मसी,लातूर  , या सर्व युनिट चे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते  . तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी  मोहिनी गडकर  व  प्रशांत पाटील  आणि  आभारप्रदर्शन  प्रा. खवले बालाजी यांनी केले.

Post a Comment

0 Comments