नगर परिषद औसा तर्फे चतुर्थ वार्षिक कर आकारणी बाबत ड्रोनद्वारे सर्वेला सुरुवात
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील मालमत्तांची चतुर्थ वार्षिक कर आकारणी नगर परिषद औसा मार्फत ड्रोनचा वापर करुन अत्याधुनिक पध्दतीने अचुक रित्या मालमत्तांचा सर्वे करण्यासाठी आमदार अभिमन्यु पवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. चतुर्थ वार्षीक कर अकारणी सन २०१९-२० मध्ये होणे आवश्यक होते, परंतू कोव्हीड १९ च्या महामारीमुळे चतुर्थ वार्षीक कर अकारणी करणे शक्य झाले नाही. नगर पालिकांचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेल्या मालमत्तांची कर आकारणी शास्त्रीय पध्दतीने करण्यासाठी नगर परिषद औसा मार्फत All India Institute of Local Self Government, Pune या संस्थेला काम देण्यात आलेले आहे. या चतुर्थ वार्षिक कर आकारणी मुळे वाढीव हद्दीतील व नविन बांधकामामुळे वाढलेल्या मालमत्तांचा सर्वे होऊन नगर पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. त्याचा शुभारंभ आज दिनांक 22/05/2023 रोजी करण्यात आला. या ड्रोन सर्वे मध्ये औसा शहरातील सर्व मालमत्तांची अचुक पणे मोजणी होणार आहे. या शुभारंभ प्रसंगी आमदार अभिमन्यु पवार, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, संतोषप्पा मुक्ता, सुभाष देशमुख, प्रदिप पाटील, कर अधिकक्षक न. प. औसा, AIILSG, Pune Team व नगर परिषद औसाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments