तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरणाला विलंब होत असल्यास तात्पुरता रस्ता तयार करावा -सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरण जामा मस्जिद ते लातूर वेस हनुमान मंदिर पर्यंतचा रस्ता पावसाळ्याच्या आत करावेत किंवा तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरणाला विलंब होत असल्यास तात्पुरता रस्ता तयार करावा .या मागणीसाठी एम आय एम च्या वतीने औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्याचे सविस्तर वृत्त असे जामा मस्जिद ते लातूर वेस हनुमान मंदिर पर्यंतचा तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरण अनेक वर्षांपासून रखडलेला असून वारंवार आपल्या कडे मागणी करुनही वेग- वेगळी कारणे दाखवण्यात येत आहेत.त्यामूळे शहरातील व तालुक्यातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.नेहमी या रस्त्यावर खड्डे पडलेले असतात व रस्त्यावरून नालीचे घाण पाणी साचलेले असते.वारंवार तात्पुरता रस्ता तयार करण्यात यावा म्हणून मागणी करण्यात आली व त्या कामासाठी निविदा पण निघाली होती, परंतू काही राजकीय व्यक्तींनी व लोकप्रतिनिधी नी काम करायचे नाही असे आपल्या कार्यालयातून सांगण्यात आले.नगरपालिकेच्या आपल्या वादामुळे शहरातील जनतेची पिळवणूक करण्यात येत आहे.व सर्वसाधारण जनतेलाही त्रास देण्याचा हेतू आहे का असे दिसून येत आहे.तरी आपण सदर रस्ता त्वरित पावसाळ्याच्या आत करण्यात यावा, किंवा तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरणाला विलंब होत असल्यास प्रशासकीय स्तरावर आपण तात्पुरता रस्ता तयार करावा.व येणाऱ्या जाणाऱ्या जनतेला होणारा त्रास दूर करावा अन्यथा एम आय एम च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी निवेदनात म्हटले आहे.
0 Comments