संघर्ष दिव्यांग संघटनेच्या तालुका उपाध्यक्षपदी पंकज गोमारे
 औसा प्रतिनिधी
 संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटनेच्या औसा तालुका उपाध्यक्षपदी पंकज राजकुमार गोमारे  यांची नियुक्ती संघटनेचे शंकर सर्जे यांनी केली आहे. दिव्यांग बांधवाचे संघटन करून दिव्यांगाच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी संघटनेच्या धोरणाला अनुसरून कार्य करावे अशी अपेक्षा नियुक्ती पत्रामध्ये केली आहे. महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाचे उपाध्यक्ष तथा खरेदी विक्री संघाचे चेअरमन संतोष सोमवंशी यांच्या उपस्थितीमध्ये पंकज राजकुमार गोमारे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले त्यांच्या नियुक्ती बद्दल औसा तालुक्यातून सर्वत्र स्वागत होत आहे.

Post a Comment

0 Comments