काँग्रेस सेवा दलाचा सच्चापाईक बिरबल देवकते
,........,..........................



 अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत काँग्रेस सेवा दलाची युवा वर्गाच्या नेतृत्वाची अतिशय कणखर टीम युवा नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये शिस्तबद्ध नियोजन आखण्याचे कार्य काँग्रेस सेवा दलाच्या तरुण वर्गाकडून यशस्वी होत असल्यामुळे काँग्रेस सेवा दलाला पक्षात अनन्यसाधारण महत्त्व आहे. लातूर जिल्ह्याचे दिवंगत लोकनेते विलासरावजी देशमुख, सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख, माजी पालकमंत्री अमित  देशमुख, आणि आमदार धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली औसा तालुक्यातील भूसनी गावचे भूमिपुत्र बिरबल वैजनाथराव   देवकते हे काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते आहेत. आपल्या उत्कृष्ट संघटन कौशल्याच्या बळावर तसेच शांत व संयमी स्वभावामुळे काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी संघटन कार्यात स्वतःला झोकून दिले. लातूर जिल्ह्यात सातत्याने होत असणाऱ्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायती सह प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रचार यंत्रणेची धुरा सांभाळत असताना प्रचार सभांचे नियोजन करण्यापासून प्रचार सभा पूर्ण होईपर्यंत निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते म्हणून सेवा दलाकडे पाहिले जाते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांनी हासेगाव जिल्हा परिषद गटामध्ये उत्कृष्ट संघटन कौशल्याच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची निष्ठेने सेवा केली. श्री बिरबल वैजनाथराव देवकते हे एक तरुण उद्योजक असून वाढत्या महागाईमुळे अडचणीत येणाऱ्या शेती व्यवसायाला जोड देण्यासाठी त्यांनी द्रोण व पत्रावळी तयार करण्याचा कारखाना सुरू करून अनेक तरुणासह महिला वर्गाच्या हाताला काम दिल्यामुळे त्यांच्या कुटुंबात आर्थिक प्रगती करण्यामध्ये बिरबल देवकते यांचे योगदान मोलाचे आहे. घरात कसल्याही प्रकारचा राजकीय वारसा नसताना आपल्या कार्य कुशलतेने बिरबल देवकते यांनी काँग्रेस पक्षामध्ये अल्पावधीमध्ये नेत्यांचा विश्वासन संपादन केला आहे. औसा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना बिरबल वैजनाथराव देवकते यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पत्रावळी व द्रोण तयार करण्याच्या मशीन, शिलाई मशीन तसेच मिरची कांडप मशीन व लहान पिठाच्या गिरण्या भेट देऊन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक आधार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. एक निष्कलंक व्यक्तिमत्व तसेच चारित्र्यसंपन्न व उच्चशिक्षित काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांची सर्वत्र ओळख निर्माण झाली आहे. आपल्या कुटुंबातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत बिरबल वैजनाथराव देवकते यांनी काँग्रेस पक्षाला उभारी देण्याचे निष्ठेने कार्य केले आहे. काँग्रेस सेवा दलाचे कुशल संघटक आणि आपले कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व गुणामुळे नेत्यांचा आदर ठेवून निष्ठेने सतत कार्यरत राहणारे बिरबल वैजनाथराव देवकते यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्यासाठी आरोग्यदायी अनंत कोटी शुभकामना.....
......................

शब्दांकन .......

 राम कांबळे औसा

Post a Comment

0 Comments