भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा व्यंकटराव गुंड यांनी केला सत्कार 
औसा प्रतिनिधी 
रुपामाता  उद्योग समूहाचे सर्वेसर्वा ऍड व्यंकटराव गुंड यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन रुपामाता मल्टीस्टेट रूपामाचा दूध उत्पादन संघ व शेतकऱ्यांच्या हितासाठी व ऊस उत्पादकांना वरदान ठरणारा पाडोळी  येथील कारखाना यांच्या प्रगती विषयी चर्चा केली. तसेच सहकार क्षेत्रामध्ये व आर्थिक क्षेत्रांमध्ये रूपामाता उद्योग समूहाच्या होत असलेल्या प्रगतीचा आढावा सादर केला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा व्यंकटराव गुंड यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. रूपामाता उद्योग समूहाच्या कामकाजाची माहिती ऐकून चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाधान व्यक्त केले व आपल्या उपक्रमास आपले सतत सहकार्य राहील असे आश्वासन दिले. याप्रसंगी रूपामाता समूहाचे अधिकारी व कर्मचारी यांचीही उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments