शेत रस्त्याचा उर्वरित पॅटर्न पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाने पुढाकार घ्यावा- आमदार अभिमन्यू पवार औसा प्रतिनिधी
 औसा तालुक्यामध्ये शेत रस्त्यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत अडचणीला सामोरे जावे लागत होते म्हणून शेत रस्ते शिवरस्ते आणि पानंदरस्त्याची मोहीम आपण शेतकऱ्यांच्या सहकार्याने तसेच पंचायत समिती जिल्हा परिषद बांधकाम आणि महसूल विभागाचे देखरेखी खाली पूर्ण करण्याचा केलेला संकल्प पूर्णत्वास जावून जवळपास 97 टक्के क्षेत्र रस्ते मोकळे झाल्यामुळे अतिक्रमण असलेल्या क्षेत्र रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. औसा तालुक्यामध्ये आता 15  शेत रस्ते अत्यंत क्लिष्ट प्रक्रियेमुळे प्रलंबित असून यामधील 5 ते 6 रस्ते भूमी अभिलेख आणि महसूल प्रशासनाने पुढाकार घेतल्यास पूर्ण होऊ शकतात. अत्यंत क्लिष्ट प्रक्रियेमध्ये थांबलेले हे रस्ते पूर्ण करण्यासाठी प्रसंगी पोलीस सुरक्षा घेऊन शेत रस्त्यावरील अतिक्रमण काढून शेतकऱ्यांचे शेत रस्ते मोकळे करण्यासाठी महसूल विभागाने पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले. 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमानंतर तहसील कार्यालयातील सभागृहामध्ये बोलत असताना त्यांनी महसूल प्रशासनास हे आवाहन केले. याप्रसंगी तहसीलदार भरत सूर्यवंशी, उपाधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय, गटविकास अधिकारी युवराज मेह्त्रे आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता तसेच नायब तहसीलदार सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी 1  मे महाराष्ट्र दिनानिमित्त तसेच कामगार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. शहीद जवानाच्या पत्नींचा गुलाब पुष्प देऊन आमदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments