बाबुराव शिवलकर यांचे निधन 
औसा प्रतिनिधी

 तालुक्यातील भादा येथील बजरंग दलाचे निष्ठावंत कार्यकर्ते बाबुराव नारायण शिवलकर वय 80 वर्ष यांचे गुरुवार दिनांक 4 मे 2023 रोजी सायंकाळी दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक विवाहित मुलगी सुना व नातवंडे असा परिवार आहे. दिवंगत बाबुराव शिवलकर हे रंग व नाट्यकर्मी म्हणून भादा पंचक्रोशीत परिचित होते. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी भादा ता.औसा येथे सकाळी 10  वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments