पत्रकार विजयकुमार बोरफळे यांना पुत्रशोक
औसा प्रतिनिधी
औसा येथील जेष्ठ पत्रकार विजयकुमार बाबुराव बोरफळे यांचे सुपुत्र विशाल विजयकुमार बोरफळे वय 35 वर्षे यांचे दिनांक 17 मे 2023 रोजी सायंकाळी आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, आजी, पत्नी व मुले असा परिवार आहे. दिवंगत विशाल बोरफळे यांच्या पार्थिव देहावर दिनांक 18 मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास भादा रोड औसा येथील सार्वजनिक स्मशान भूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीसाठी नातेवाईक व विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
0 Comments