धर्मवीर संभाजी महाराज जयंती औसा येथे उत्साहात संपन्न
 औसा प्रतिनिधी
 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक 14 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता पाटील गल्ली येथील  कोष्ट्याई देवी मंदिरासमोर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी राजेंद्र गिरी महाराज,अमर खानापुरे, गोपाळ धानुरे, सुनील उटगे,भरत सुर्यवंशी, प्रदिप मोरे,बंडू कोद्रे,समीर डेंग, गणेश मुंगळे, अशोक नाईकवाडे, नितीन शिंदे, जगदीश परदेशी,बाळू सोनवळकर, लक्षण कुचमे, गणेश हाके,गुंडानाथ सुर्यवंशी,रवी सुर्यवंशी,गुरुलिंग देशमाने आदि मान्यवरांसोबत  छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.व तसेच सायंकाळी 6 वाजता औसा शहरातील मुख्य रस्त्यावरून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य आणि स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी दिलेले बलिदान भारताच्या  इतिहासात आजारावर ठरले आहे. म्हणून छत्रपती संभाजी महाराज प्रेमी लोकांनी औसा शहरात प्रतिमेची भव्य मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला. जयंती समितीचे पदाधिकारी मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील होते.

Post a Comment

0 Comments