कर्नाटक विधानसभेत काँग्रेसच्या अभूतपूर्व विजयाचा औसा येथे कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढून केला जल्लोष
औसा मुखतार मणियार
दिनांक 10 मे 2023 रोजी पार पडलेल्या कर्नाटक विधानसभेच्या 224 जागेसाठी शनिवार दिनांक 13 मे 2023 रोजी मतमोजणीला सुरुवात झाली आणि मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच कर्नाटक राज्यातील विधानसभेच्या अनेक मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार आघाडीवर होते 224 पैकी 134 जागेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आभूतपूर्व विजय मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे यामुळे औसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोटार सायकल रॅली काढून जल्लोष साजरा केला. गॅस सिलेंडरचा निषेध ट्रेंड यशस्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि युवा नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कर्नाटक राज्यातील जनतेने काँग्रेसच्या बाजूने भक्कमपणे उभा राहत विजयाचा यशस्वी कौल दिला आहे. केंद्र सरकार महागाई रोखण्यासाठी सपशेल अपयशी ठरत असून गॅस सिलेंडरच्या किमती मध्ये भरपसाठ वाढ झाली. कर्नाटक विधानसभेमध्ये काँग्रेस उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी गॅस सिलेंडरला पुष्पहार घालून वाढत्या महागाईचा निषेध करीत गॅस सिलेंडर च्या वाढत्या किमतीला श्रद्धांजली अर्पण करीत काँग्रेस पक्षाचा प्रचार केलेला ट्रेंड यशस्वी झाला आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले प्रवेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील आणि युवा नेते तथा माजी मंत्री अमित भैया देशमुख यांनीही प्रचाराची सुरुवात सांभाळत कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेस पक्षाचा जोरदार प्रचार केला. त्यामुळे काँग्रेस पक्षाला कर्नाटक विधानसभेमध्ये भरघोस यश संपादन करता आले. औसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करून भव्य मोटार सायकल रॅली काढून काँग्रेस पक्षाच्या कर्नाटक विधानसभेतील विजयाचा विजय असो साजरा केला. या रॅलीमध्ये प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे, प्रदेश सचिव ऍड दीपक राठोड, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत राचट्टे, तालुका अध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, शहराध्यक्ष शेख शकील, विवेक मिश्रा,प्रनिल उटगे,अनीस जहागीरदार, जयराज कसबे,अंगद कांबळे, मुज्जमिल शेख, अँड.फेरोज पठाण, सुलतान शेख, खाजाभाई शेख, हमीद सय्यद ओबीसी सेलचे शहराध्यक्ष, विलासराव देशमुख युवा मंच शहराध्यक्ष खुंदमीर मुल्ला,नियामत लोहारे,बबन बनसोडे ,पवन कांबळे आदि काॅग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments