औसा बस स्थानाकांमधील शौचालयाची दुरावस्था झाल्याने औसा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील मुख्य बसस्थानक येथील सुलभ शौचालयातील दुरावस्था झालेली असून सदरीत शौचालयाला सेफ्टी टँक नसल्यामुळे मोकळ्या जागेमध्ये एक मोठा खड्डा मारून शौचालय चालू आहे. या खड्यात मागील काही वर्षापूर्वी एक मुलगा पडून त्यांचा मृत्यू झाला होता. व तसेच परवा दि. ५ एप्रिल रोजी परत या खड्यात लातूरची महिला पडली होती. सुदैवाने सदरीत महिलेला स्थानिक नागरिकांनी वेळेवर खड्यातून बाहेर काढून त्या महिलेचा जीव वाचविला.
सदरीत शौचालय हे औसा बसस्थानकमध्ये आहे. या शौचालयाचा दररोज शेकडो प्रवासी व स्थानिक नागरिक शौचासाठी जात असतात. पण या शौचालयाला सेफ्टी टैंक नसल्यामुळे शौचालयासाठी जाणाऱ्या
नागरिकांचा जीव धोक्यात पडत आहे. वारंवार या बाबत बसस्थानक प्रमुख व आगार प्रमुखांना तक्रार
करूनसुद्धा या गोष्टींची दखल ते घेत नसल्यामुळे आपण तालुका दंडाधिकारी या नात्याने औसा बस स्थानाकांमधील शौचालयाची दुरावस्था झालेली ती त्वरीत लक्ष घालून दुरुस्ती करावी.
या मागणीसाठी औसा तहसील कार्यालयासमोर
11 एप्रिल मंगळवार रोजी महाआघाडी च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात यावेळी शिवसेनेचे नेत्या जयश्रीताई उटगे, शिवसेना शहरप्रमुख सुरेश दादा भुरे, उपशहरप्रमुख किरण कदम, युवासेनेचे शहरप्रमुख आकाश माने व काॅग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शकील शेख,तालूकाध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी,माजी नगरसेवक अंगद कांबळे, सामाजिक कार्यकर्ते खुंदमीर मुल्ला आदिनी औसा तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करुन औसा तहसीलदार यांना निवेदनद्वारे मागणी करण्यात आली.
0 Comments