*बाजार समिती निवडणुकीत विश्वासघात करणाऱ्या काँग्रेसने शिवसेनेला गृहीत धरू नये पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख शिवाजी माने* 
औसा प्रतिनिधी -
कृषी उत्पन्न बाजार समिती  औसाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचे ठरले होते .महाविकास आघाडी मध्ये शिवसेनेचे कोणते उमेदवार द्यावेत याचे सर्व अधिकार जिल्हाप्रमुखांना असताना तथाकथित महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या नेत्याने शिवसेनेच्या एका गटाला सोबत घेऊन आमचा विश्वासघात केला असल्याने काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत गृहीत धरू नये असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी केले.
   माजी आमदार दिनकरराव माने यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली .
शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचे चार उमेदवार घेण्यास सांगितले होते, परंतु महाविकास आघाडीच्या प्रमुखांनी शिवसेनेला उमेदवारी देताना अन्याय केला आहे त्यामुळे महाविकास आघाडीने या निवडणुकीमध्ये शिवसेनेला गृहीत धरू नये. शिवसेना महाविकास आघाडी सोबत नसल्याचे त्यांनी स्पष्ट करून महाविकास आघाडी ला आव्हान दिले आहे.
    यावेळी बोलताना शिवाजीराव माने म्हणाले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश हा सर्व जण मानत असतात, परंतु एका गटाने त्यांना कोणतेही अधिकार नसताना काँग्रेस सोबत हात मिळवणी केली असल्याने आम्ही त्यांना शिवसैनिक मानत नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रकारांनी बाजार समिती महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष सोमवंशी, तालुकाप्रमुख सतीश शिंदे, बाजार समितीचे माजी उपमुख्य प्रशासक किशोर जाधव हे शिवसैनिक नाहीत काय? असा प्रश्न उपस्थित केला असता पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ध्येयधोरणाला तडा देणारे शिवसैनिक असू शकत नाहीत. असे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औसा तालुक्यामध्ये शिवसेनेमध्ये फूट पडली असून वेगवेगळे दोन गट निर्माण झाल्याचे अखेर निदर्शनास आले आहे. यावेळी शिवसेनेचे पप्पूभाई कुलकर्णी, महिला आघाडीच्या जयश्रीताई उटगे, माजी तालुकाप्रमुख संजय उजळंबे विनोद माने, सहदेव कोळपे, शिवसेनेचे तालुका प्रभारी तानाजी सूर्यवंशी, शहर प्रमुख सुरेश दादा भुरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments