सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांना राज्य शासनाचा उद्या सांस्कृतिक कार्य पुरस्कार
औसा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने सांस्कृतिक क्षेत्रातील लोककला, कीर्तन, प्रवचन, भजन, नाट्य संगीत व समाज प्रबोधन कार्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने राज्य सांस्कृतिक कार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य पुरस्कार औसा येथील नाथ संस्थांचे सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांना जाहीर झाला असून उद्या दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी पूल देशपांडे सभागृह मुंबई येथे सांस्कृतिक कार्य मंत्री व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सायंकाळी 6 वाजता हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. औसा येथील संत विरुनाथ मल्लिनाथ महाराज संस्थांचे सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आपल्या अध्यात्माच्या सेवेतून भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य अविरत सुरू ठेवले आहे. भागवत धर्माची पताका साता समुद्रापलीकडे घेऊन जाण्याचे कार्य त्यांच्या हातून होत असून या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्य सांस्कृतिक कार्य पुरस्कार जाहीर केला आहे. पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर, रवींद्रनाथ महाराज, मच्छिंद्रनाथ महाराज, गोरखनाथ महाराज तसेच नाथ सेवा मंडळ औसा गीताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औसा व नाथ संस्थांच्या सदभक्तांच्या वतीने सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या या पुरस्काराबद्दल अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
0 Comments