विष्णू सोमवंशी  यांचा निरोप समारंभ संपन्न 
औसा  प्रतिनिधी
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदाळा लो. येथील शिक्षक श्री विष्णू सोमवंशी हे नियत वयोमानानुसार प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा निरोप समारंभ औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहांमध्ये ठेवण्यात आला. याप्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन महादेव खिचडे यांच्या शुभ हस्ते याप्रसंगी पतसंस्थेचे  सत्कारमूर्ती विष्णू सोमवंशी यांचा शाल,श्रीफळ, फेटा, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री कुमार स्वामी महाविद्यालयाचे प्राचार्या  डां महेश्वर बेटकर उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये सेवानिवृत्त विस्तार अधिकारी राम कापसे, पतसंस्थेचे सचिव संजय जगताप, व्हाईस चेअरमन हरीश आयतनबोने, सोमनाथ देशमाने, मोतुलाल शारंग वाले, प्रताप जाधव, अनंत भोजने आधी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदाळा लो. येथील शिक्षक स्टाफ यांच्या वतीने निरोप सभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्षा वर्मा, उर्मिला उटगे, रंजना लोखंडे, रवी गोसावी, सिताराम क्षीरसागर ,गोविंद कोल्हे यांच्यासह सत्कारमूर्ती विष्णू सोमवंशी यांचे नातेवाईक शिक्षक शिक्षिका तसेच पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र गोसावी यांनी तर आभार प्रदर्शन गोविंद कोल्हे यांनी केले.

Post a Comment

0 Comments