महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन..
औसा प्रतिनिधी
क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले महोत्सव समिती 2023 यांनी तीन दिवसाचे मा.फुले यांच्या 196 व्या जयंती निमित्त माळी गल्ली औसा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या 196 व्या जयंती निमित श्री संत शिरोमणी सावता माळी चौक ,माळी गल्ली औसा येथे दिनांक 09/04/2023 ते 11/04/2023 या तीन दिवसाच्या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . दिनांक 09 एप्रिल 2023 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबीराचे उदघाटन श्री सचिन माळी व श्री अनिल म्हेत्रे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पहिल्यांदाच मा.फुले यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय या रक्तपिढीस जवळपास 50 रक्तदात्यानी रक्तदान केले आहे . दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 4.00 लहान मुलामुलीसाठी रांगोळी स्पर्धा ,निबंध स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा व नृत्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी सकाळी 09.00 वाजता क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस हार घालून विनम्र अभिवादन करण्यात येणार असून दुपारी 4.00 वाजता महात्मा जोतिबा फुले यांची भव्य अशी मिरवणुक शोभायात्रा काढण्यात येणार आह तरी सर्व सर्व फुले प्रेमीनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा व तसेच मिरवणुकीमध्ये उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आव्हान *समितीचे अध्यक्ष पियुष म्हेत्रे ,उपाअध्यक्ष अजय फुटाणे *, सचिव प्रसाद फुटाणे ,सहसचिव खंडू क्षिरसागर ,उमेश सुतार ,कोषाध्यक्ष भैरु यादव, केदार जोशी, मिरवणूक प्रमुख गोरख पांढरे,आकाश फुटाणे सजावट प्रमुख नितीन सोनवळकर यांनी केले आहे.
0 Comments