राजपत्रित अधिकाऱ्यांचा संप सुरूच महसूल ची कामे रखडली
 औसा प्रतिनिधी 
महाराष्ट्र राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांनी ग्रेड पे लागू करावा या मागणीसाठी संप पुकारला असून या संपाचा परिणाम म्हणून तहसील कार्यालयातील महसूल विभागातील कामे रखडल्याने नागरिकांना याची झळ सोसावी लागत आहे. तहसील कार्यालयातून उत्पन्न रहिवासी राष्ट्रीयत्व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक जात प्रमाणपत्र भूमिहीन व अल्पभूधारक प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांची विद्यार्थ्यांना आवश्यकता असते. दहावी आणि बारावी परीक्षेनंतर जेईई व नीट परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची सध्या संपामुळे अडचण होत असून राजपत्रित अधिकाऱ्यांच्या राज्यव्यापी संपामुळे औसा तहसील कार्यालयातील कामे रखडल्याने पालक व विद्यार्थी वर्गाची गैरसोय होत आहे.

Post a Comment

0 Comments