औसा ग्रामीण रुग्णालय येथे डिलीवरी सिजेरियनची व सोनोग्राफीची व्यवस्था करावी -खुंदमीर मुल्ला
औसा प्रतिनिधी
औसा ग्रामीण रुग्णालय येथे डिलीवरी साठी येणाऱ्या महिलांना सिजेरीयनची सुविधा नसल्यामुळे या गोर गरीब महिलांना नाईलाजाने खाजगी रुग्णालयात दाखल होऊन हजारो रुपये खर्च करुन सिजेरीयन करुन घ्यावे लागत आहे. व तसेच औसा ग्रामीण रुग्णालय येथे सोनोग्राफी सेंटरची व्यवस्था नसल्यामुळे गरोधरपणाच्या नऊ महिन्यात खाजगी सोनोग्राफी सेंटर येथे 5-6 सोनोग्राफी करावे लागत आहेत. ज्याचा खर्च 10 हजार रुपये ते12 हजार रुपये होत आहे. हे की, गोर गरीब दररोज मोल मजुरी करुन खाणाऱ्या कुटूंबाना डीलीवरी साठी सिजेरीयनची आवश्यकता पडल्यास खाजगी रुग्णालयात 30 हजार ते 40 हजार रुपये गरोधर महिलेची परिस्थिती नसतानाही खर्च सहन करावा लागत आहे.
तरी माननीय जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्वरीत औसा ग्रामीण रुग्णालय येथे वरील विषयानुसार दोन्ही सुविधा उपलब्ध करुन देऊन होणारी जनतेचा अर्थिक बोजा कमी करावा अशी मागणी आज दिनांक 27 एप्रिल गुरुवार रोजी विलासराव देशमुख युवा मंचचे शहराध्यक्ष खुंदमीर मुल्ला यांनी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा कार्यालय लातुर येथे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
0 Comments