महाविकास आघाडीच्या  उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा  -डॉ अफसर शेख यांचे आवाहन. .
 औसा प्रतिनिधी 
औसा बाजार समिती निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील सर्वच उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अफसर शेख यांनी केलेले आहे. तसेच या निवडणुक पॅनलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उमेदवारी दिलेले लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा राष्ट्रवादीचे तरुण तडफदार नेते  श्रीकांत सूर्यवंशी व  जिल्हा परिषदेचे माजी सदस्य  दिलीप लवटे यांनाही भरघोस मतानी निवडून देण्याचे आवाहन केले आहे.
बाजार समितीच्या मतदारांनी योग्य तो निर्णय घेणे आवश्यक असून महाविकास आघाडीच्या ताब्यात बाजार समिती दिल्यास येणाऱ्या कालखंडामध्ये बाजार समिती मध्ये  आमुलाग्र असे प्रगतिशील बदल करून व कारभारात पुन्हा एकदा सुसूत्रता आणून कष्टकरी शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या व जनतेस सेवाभावी वृत्तीने कामे करण्यात येऊन बाजार समीतीचा विकास साधण्यात येईल तसेच असे करण्यास महाविकास आघाडी चे सर्व उमेदवार सक्षम आहेत व या उलट औसा भाजपास, बाजार समीती चालवण्याचा विशेष असा अनुभव नसल्याने, बाजार समितीचा कारभार हाकण्यामध्ये अडचणी निर्माण होतील व त्याचा थेट परिणाम शेतकरी व व्यापारी तसेच प्रत्यक्ष जनतेस होणार आहे. असे अफसर शेख यानी औसा ग्रामीण मधे मतदाराशी संवाद साधताना सांगितले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची औसा नगरपालिकेमध्ये सत्ता असताना बाजार समितीस नेहमीचे सहकार्य राहिलेला आहे. बाजार समितीतील विविध विकास कामाच्या रेखा नकाशा व नियोजनास मान्यता देण्याचा काम केलेला आहे.तसेच या परिसरामध्ये भौतिक सुविधा ज्या मधे लाईट, नवीन रस्ते इत्यादी सह करामध्ये सूट दिली आहे. तसेच किल्ला आठवडी बाजार परिसरामध्ये मध्ये बीट मार्केट तसेच इतर व्यापारी दुकानांसाठीही नगरपालिकेतर्फे विशेष सुविधा ज्यामधे शेडचे काम, पाण्याची व्यवस्था, पेवर ब्लॉक या परिसरातील व्यापारी दुकानांची हीच लक्षात घेता सकारात्मक निर्णय घेतली व त्यांचे हीत जपणयाचे कामे केली आहेत.मार्केट यार्ड साठी जाणारा मुख्य रस्ता केदारनाथ मंगल कार्यालय ते आझाद चौक हा रस्ता बऱ्यापैकी पूर्ण केला आहे. तसेच आगामी काळात या रस्त्याची व गटारीचे कामही पूर्ण करण्यात येईल भविष्यामध्ये ही जनावरांचा बाजार साठी या परिसरामध्ये योग्य ते सहकार्य करण्यात येईल.
महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार व सर्वच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना भरभरून मतांनी निवडून द्यावे व बाजार समितीचे अस्तित्व अबाधित राहण्यासाठी औशातील सुजाण मतदारांनी महाविकास आघाडीस सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा कार्याधयक्ष डॉ अफसर शेख व युवक जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी सह सर्व राष्ट्रवादी नेते मंडळी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments