डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जीवनात रुजविणे महत्त्वाचे- प्रा. निजामुद्दीन शेख...

औसा प्रतिनिधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथांग ज्ञानाच्या जोरावर अहोरात्र अभ्यास करून भारत देशाला संविधान दिले. भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचा नावलौकिक देशभर झाल्याने बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजातील प्रत्येक नागरिकांनी रुजविणे महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन प्रा. निजामुद्दीन शेख यांनी केले .औसा येथील अजीम हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यार्थी व पालक वर्गाने बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची कास धरून आपल्या जीवनाची प्रगती केली पाहिजे. त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष  करा हा दिलेला मंत्र समाजामध्ये त्रिकालाबाधित सत्य असून आपल्या यशस्वी जीवनाची वाटचाल करण्यासाठी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करणे काळाची गरज आहे असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.  याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक दानिश शेख, डॉ खलील सिद्दीकी,  केसरे , कांबळे एच जी, कांबळे ए. बी.  फुलारी के वी., यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस व्ही मेटे यांनी केले.

Post a Comment

0 Comments