औसा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी..  
औसा प्रतिनिधी 
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त औसा शहर व तालुक्यामध्ये आंबेडकर प्रेमी बांधवांनी घटनेच्या शिल्पकारांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. भीम नगर औसा येथे आमदार अभिमन्यू पवार यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहण व बुद्ध वंदना त्रिशरण मंत्र उच्चार करीत कार्यक्रमाचे सुरुवात झाली. सामाजिक समरसता मंच तर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस 132 खोबऱ्यांचा हार घालून अभिवादन करण्यात आले. ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या घोष पथकाने पारंपारिक घोष निनाद करून मानवंदना दिली.
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव कल्पनाताई डांगे यांनी करून औसा  येथे बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व पुतळा उभारावा अशी मागणी केली. याप्रसंगी बोलताना आमदार अभिमन्यू पवार यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवराय, जगत ज्योती महात्मा बसवेश्वर, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या चारही महापुरुषांच्या पुतळा बसवण्यासाठी औसा शहरांमध्ये एक भव्य सुसज्य पार्क तयार करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख नगर परिषदेचे प्रशासक अजिंक्य रणदिवे, सुनील उटगे, अँड अरविंद कुलकर्णी, डॉ. रामलिंग कसबे, काँग्रेसचे हनमंत राचट्टे, माजी नगरसेवक भरत सूर्यवंशी, अंगद कांबळे, विवेक मिश्रा, बालाजी शिंदे, पंचायत समितीचे अभियंता रवी भावले, वंचित बहुजन आघाडीचे शिवरुद्र बेरूळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. औसा शहरातील समता नगर बौद्ध नगर आणि भीम नगर येथील आंबेडकर प्रेमी बांधवांनी आपापल्या बुद्ध विहारांसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. सायंकाळी सहा वाजता औसा शहरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये शालेय विद्यार्थी तसेच तरुणांनी विविध गीताच्या तालावर नृत्य सादर करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.ज्ञान सूर्याला अभिवादन करण्यासाठी जनसआगरआनए भिम जल्लोष केला.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयंती समितीचे अध्यक्ष आशिष बनसोडे, उपाध्यक्ष आनंद बनसोडे, सचिव शरद बनसोडे यांच्यासह जयंती समितीचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील होते. भव्य मिरवणुकीमध्ये असंख्य आंबेडकर प्रेमी महिला, पुरुष उत्साहाने सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments