खा. निंबाळकर यांच्या उपस्थितीत औसा येथे 600 दिव्यांगाची शिबिरात तपासणी 
औसा प्रतिनिधी 
धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या संकल्पनेतून दिनांक 17 ते 27 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघात दिव्यांगाचे मोफत तपासणी करून दिव्यांगांना आवश्यक साहित्य वितरण करण्यासाठीचे शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिराचा भव्य उद्घाटन सोहळा नगर परिषद सांस्कृतिक सभागृह औसा येथे दिनांक 17 एप्रिल रोजी झाला. रामचंद्र युवक कल्याण संस्था मोजरी सामाजिक न्याय व अधिकारी चा मंत्रालय नवी दिल्ली जिल्हा प्रशासन लातूर सत्यम दिव्यांग मंच संचलित पंकजा कन्सल्टन्सी परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील नगरपरिषद सांस्कृतिक सभागृहामध्ये तालुक्यातील सुमारे 600 दिव्यांगाची तपासणी करण्यात आली या शिबिरामध्ये दिव्यांग बांधवांचे वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाईन करून त्यांना यूआयडी कार्ड देणे तसेच गरजू दिव्यांगांना साहित्य देता यावे म्हणून त्यांना आवश्यक असणाऱ्या साहित्याची नोंद करून घेण्यात आली. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, तालुकाप्रमुख सतीश शिंदे, खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन शेखर चव्हाण, बाजार समितीचे माजी उपमुख्य प्रशासक किशोर जाधव, गट विकास अधिकारी युवराज मेत्रे, सहाय्यक गटविकास अधिकारी सचिन पाटील, विस्तार अधिकारी बीजे पोतदार, बीपी तेलंग, ए व्ही मांजरे, राठोड कनिष्ठ लेखा अधिकारी, धम्मदीप डांगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. दिव्यांगाच्या या शिबिरामध्ये गोविंद कुमार, अविनाश सिंग डॉ. अनुराग, डॉ गोपाल तिवारी, गौरव तिवारी, यांनी दिव्यांगांना मार्गदर्शन करून ऑनलाइन प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणाऱ्या तांत्रिक बाबीच्या नोंदी करून घेतल्या. या शिबिरामध्ये दिव्यांगाची नोंदणी करण्यासाठी दिव्यांग भव्य क्रांती संघटनेचे आत्माराम मिरकले, प्रहार दिव्यांग संघटनेचे ओमप्रकाश हजारे यांच्यासह शिवसैनिकांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments