सावरकर गौरव यात्रेचा औसा शहरात शुभारंभ 

औसा प्रतिनिधी 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी अवमान केल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम सावरकर प्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या होत्या. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील 288 मतदार संघातून सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशभक्तीसाठी मोठे योगदान दिले आहे. तसेच स्वातंत्र्यसंग्रामामध्ये काम करत असताना अंदमान मध्ये दोन वेळा काळा पाण्याची शिक्षा भोगलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे महान कार्य असताना त्यांचा अवमान खपवून घेणार नाही म्हणून सावरकर गौरव यात्रेचे राज्यभर आयोजन करण्यात आले आहे. औसा विधानसभा मतदारसंघातील सावरकर गौरव यात्रेचा शुभारंभ मंगळवार दिनांक 4 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवराय, भारत माता आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. या गौरव यात्रेमध्ये माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके, लातूर जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, जेष्ठ नेते सुशील कुमार बाजपाई, अँड अरविंद कुलकर्णी, भीमाशंकर राचट्टे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील उटगे, माधव सिंह परिहार,  समीर डेंग, मुन्ना वागदरे, धनराज पर्सने, भीमाशंकर मिटकरी, कंठाप्पा मुळे, संदिपान जाधव,लहु कांबळे, महिला आघाडीच्या प्रदेश सचिव कल्पना डांगे, सुनिता सूर्यवंशी, यांच्यासह हजारो सावरकर प्रेमी बांधव गौरव यात्रेमध्ये सहभागी झाले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर भगतसिंग राजगुरू सुखदेव या क्रांतिकारकांच्या वेषभूषेचे सजीव देखावे या मिरवणुकीमध्ये सहभागी करण्यात आले होते.  वारकरी दिंडी, धनगरी ढोल, तसेच ढोल ताशाच्या गजरामध्ये औसा शहरातील मुख्य रस्त्यावरून सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. या गौरव यात्रेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेसह हजारो कार्यकर्त्यांनी मी सावरकर अशा टोप्या घालून तसेच सावरकरांच्या आत्मसन्मान वाढवणारे बॅनर हातात घेऊन गौरव यात्रेमध्ये सहभाग नोंदविला. या गौरव यात्रेची सांगता औसा येथील ऐतिहासिक किल्ला मैदानाजवळ झाली. ही गौरव यात्रा दिनांक 5 एप्रिल रोजी औसा विधानसभा मतदारसंघातील निलंगा तालुक्यातील सर्व महसुली मंडळामध्ये जाणार असून कासार शिरशी येथे या गौरव यात्रेचा समारोप करण्यात येणार असल्याची माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळी दिली.

Post a Comment

0 Comments