गोपीनाथराव मुंडे शेतकरी जनहित पॅनलला  विजयी करा -रमाकांत वळके पाटील  
 औसा प्रतिनिधी 
औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये औसा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली गोपीनाथराव मुंडे शेतकरी जनहित  विकास पॅनलचे सर्वच उमेदवार जनतेच्या हिताचे रक्षण करणारे, तसेच व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या हिताची जाण असणारे, तळमळीचे उमेदवार उभे आहेत. औसा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करण्यासाठी गोपीनाथराव मुंडे शेतकरी जनहित विकास पॅनलच्या  उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन रमाकांत वळके पाटील यांनी केले आहे. सहकारी संस्था मतदार संघ ग्रामपंचायत मतदार संघ आणि हमाल मापाडी मतदारसंघातून या पॅनलमध्ये स्वच्छ व चारित्र्यसंपन्न उमेदवारांना  संधी   देण्यात आली  असून या उमेदवारांच्या पाठीशी सुजाण मतदार बांधवांनी खंबीरपणे साथ द्यावी. मतदारांनी संधी दिल्यास हे सर्व उमेदवार जनतेच्या विश्वासाला पात्र राहून काम करतील असा विश्वास रमाकांत वळके पाटील यांनी व्यक्त केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठी वचनबद्ध आहेत. सहकारी  संस्था मतदार संघातून प्रकाश चंद्रकांत काकडे, प्रवीण प्रभाकर कोपरकर, अजित सिद्राम धुमाळ, युवराज शाहूराज बिराजदार, भीमाशंकर प्रभूप्पा राचट्टे, संदिपान मनोहर लंगर, चंद्रशेखर भाऊराव सोनवणे, संतोषी अशोक वीर, चंद्रकला पुरुषोत्तम झिरमिरे, विकास पंडित नरहरे आणि ईश्वर रामविलास कुलकर्णी तर ग्रामपंचायत मतदार संघातून रमाकांत विठ्ठल वळके, राधाकृष्ण बालाजी जाधव, मोहन विष्णू कावळे आणि गोविंद काशिनाथ भोसले तर हमाल मापाडी मतदारसंघातून शंकर शहाजी पुंड या उमेदवारांना रोड रोलर या चिन्हा समोर शिक्का मारून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments