औसा कृषी उत्पन्न बाजार समिती महाविकास आघाडी कडून भाजपने हिसकावली ; आमदार अभिमन्यू पवारांचा हाबाडा ...औसा /प्रतिनिधी : -दि. 28 एप्रिल 2023 रोजी तब्बल 07 वर्षानंतर झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती औशाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना, महाविकास आघाडीला जोरदार हाबडा देत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी महाविकास आघाडी कडून कृषी उत्पन्न बाजार समिती हिसकावून घेतली आहे. विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या विश्वासावर कृषी उत्पन्न बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व स्थापन करीत महाविकास आघाडी कडून कृषी उत्पन्न बाजार समिती औसा हिसकावून घेत, महाविकास आघाडीला दणका दिला आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने 16 उमेदवार उभे केले होते. हे सर्वच उमेदवार 100 पेक्षा अधिक मताधिक्याने दणदणीत विजय संपादन करीत सर्वच उमेदवारांनी यशश्री खेचून आणली. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. हमाल मापाडी मतदारसंघातील शंकर शहाजी पुंड यांच्या रूपाने सर्वप्रथम निकाल लागत भारतीय जनता पार्टीने खाते उघडले. नंतर झालेल्या ग्रामपंचायत आणि सहकारी संस्था मतदार संघात सुरुवातीपासूनच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आघाडीवर होते. आमदार अभिमन्यू पवार भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुनील उटगे,  भीमाशंकर राजट्टे, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार बाजपाई, ॲड अरविंद कुलकर्णी, अँड मुक्तेश्वर वागदरे, कंठप्पा मुळे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने निवडणुकीचे शिस्तबद्ध नियोजन करून महाविकास आघाडी पासून औसा कृषी उत्पन्न बाजार समिती हिसकावण्यात यश संपादन केले आहे. शुक्रवार दि.  28 एप्रिल 2023 रोजी 04 वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर 05 वाजता प्रत्यक्ष मतमोजणी सुरुवात झाली. श्री मुक्तेश्वर विद्यालय औसा येथील सभागृहामध्ये मतमोजणी करत बंदोबस्तामध्ये सुरू झाल्यानंतर या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे सर्वच उमेदवार विजयी झाले. विजय उमेदवार मतदार संघ नावे पुढीलप्रमाणे
-  *अनुसूचित जाती जमाती* *गट* कावळे मोहन विष्णू(602), *ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक* भोसले गोविंद काशिनाथ (575), *ग्रामपंचायत सर्वसाधारण   गट* जाधव राधाकृष्ण बालाजी (573), वळके रमेश विठ्ठल (540),   *इतर मागासवर्गीय गट* नरहरी विकास पंडितराव (515), *संस्था सर्वसाधारण गट* कोपरकर प्रवीण प्रभाकरराव (483), लंगर संदिपान मनोहर (478), सोनवणे चंद्रशेखर भाऊराव (475), बिराजदार युवराज शाहूराज (472), काकडे प्रकाश चंद्रकांत (472), धुमाळ अजित सिद्राम (471), राचट्टे भीमाशंकर प्रभू आप्पा (471), *सर्वसाधारण महिला गट* झिरमिरे चंद्रकला  पुरुषोत्तम (504), वीर वीर संतोषी अशोक (494), *भटक्या विमुक्त जाती गट* कुलकर्णी ईश्वर रामविलास (515), व्यापारी गट आवटी सुरेश सिद्धाप्पा (281), जाधव धनराज जय हिंद (266), *हमाल मापाडी गट* पुंड शंकर शहाजी (45) या उमेदवारांनी विजय संपादन केला असून
निवडणूक व मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी तहसीलदार भरत सूर्यवंशी, निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था एस के कदम, पोलीस निरीक्षक शिवशंकर पटवारी यांच्यासह निवडणूक विभागामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत चोख कामकाज केले. भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.

Post a Comment

0 Comments