हजरत सुरतशाह उर्दु शाळेपासून काझी गल्ली,मोमीन गल्ली ते माळी गल्ली पर्यंत असलेली मोठी नाली साफ सफाई करा ...
औसा प्रतिनिधी
औसा येथिल हजरत सुरतशाह उर्दू शाळे पासून काझी गल्ली,मोमीन गल्ली,माळी गल्ली पर्यंत असलेली मोठी नाली टेंडर काढून साफ सफाई करून घेण्यात यावी या मागणीसाठी आज नगरपरिषद औसा यांना निवेदन देण्यात आले.
एक महिन्या नंतर पावसाळा सुरू होणार आहे गेल्या एक वर्षा पासून ही नाली काढण्यात आली नाही. नाली न काढल्या मुले नाली पूर्ण भरून गेली आहे त्या मुळे पावसाळ्यात मोमीन गल्ली,ढोर गल्ली ,न्हावी गल्लीतील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी घरात शीरत आहे त्या मुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यांच्या घरातील वस्तूंचे नुकसान होत असते ते नुकसान होऊ नये म्हणून नगरपालिका प्रशासन व मुख्याधिकारी साहेबानी लवकरात लवकर टेंडर काढून नाली काढून घ्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमर पंजेशा,व अफसर शेख युवा मंच चे अध्यक्ष सय्यद मुस्तफा इनामदार यांच्या तर्फे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
0 Comments