औसा तालुक्यात मग्रारोहयोच्या यशस्वी कामाचे चित्रीकरण करण्यासाठी टीम दाखल 

औसा-तालुक्यात मग्रारोहयोच्या यशस्वी कामाचे चित्रीकरण करण्यासाठी टीम दाखल झाले आहेत.यामध्ये 
सुमित गोरले, राज्य GIS प्रकल्प अधिकारी नरेगा नागपूर आणि कॅमेरामन याची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत करण्यात आलेल्या उत्कृष्ट कामांची यशोगाथा (व्हीडीओ ग्राफी) राज्य स्तरावरून नेमलेली Videography team दि. ०५ ते ०७ एप्रिल २०२३ औसा येथे भेट देवून करण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे.
 त्या अनुषंगाने सदर ग्रामपंचायतीचे संबंधीत कर्मचारी, तांत्रीक सहायक व ग्रामरोजगार सेवक यांना दिलेल्या दिनांकास उपस्थित राहणेबाबत आपले स्तरावरून सुचना देण्यात याव्यात.असे पत्र दिले आहे.
तसेच सदर टीम सोबत समन्वय साधणे करीता सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सूर्यकांत बरबोले, नितिन चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी टीम सोबत समन्वय व आवश्यक ती व्यवस्था करून उत्कृष्ट कामांची यशोगाथा (व्हीडीओ ग्राफी) व्यवस्थित पार पाडली असून सदर पथकाकरीता वाहन, निवास व भोजनाची व्यवस्था आपले स्तरावरून करण्यात यावी असे पत्र उपजिल्हाधिकारी रोहयो यांनी दिले आहे. 
यासंदर्भात बुधवार दिं 5 एप्रिल 2023 रोजी भादा येथील बिहार पॅटर्न वृक्ष लागवड,फळझाड वृक्ष लागवड आणि अंतर्गत रस्ते,शेत रस्ते,शिवरस्ते पानंद रस्ते आणि मातोश्री रस्त्यांची व्हिडिओ शूटिंग करण्यात आले.
यावेळी भादा येथील उपसरपंच बालाजी शिंदे, ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी, ग्रामरोजगार सेवक बालाजी दे उबाळे, ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत उबाळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments