युवा सेनेच्या उपशहरप्रमुखपदी अमोल मोरे
औसा-(सा.वा.)दि.२१
शिवसेना पक्षप्रमुख उध्वजी ठाकरे, युवा सेना प्रमुख अदित्य ठाकरे, यांच्या आदेशावरुन औसा उपशहरप्रमुखपदी अमोल विनायक मोरे यांची निवड करण्यात आली.
  शिवसेनेच्या राज्य समन्यवक आयोध्याताई पौळ हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून ते आज शुक्रवारी लातूर जिल्याच्या दौऱ्यावर असून येथील शासकीय विश्राम गृह येथे कार्यक्रत्याशी संवाद साधून सर्व युवा सेनेच्या आजी माजी कार्यक्रत्यांनी आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन सर्वांनी एकमेकांशी संवाद साधून शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवजी ठाकरे व युवा सेना प्रमुख अदित्य ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे टाकावे व पक्षाची बांधणी मजबूत करावी. असे आवाहनही यावेळी युवा सेनेच्या राज्य समन्वयक आयोध्याताई पौळ यांनी उपस्थित कार्यक्रत्यांना केले.
  यावेळी दिनेश जावळे जिल्हाप्रमुख युवा सेना लातूर, अभिजीत जाधव उपजिल्हाप्रमुख, महेश सगर तालुका प्रमुख, आकाश माने शहर प्रमुख, अमोल पाटील, अजित सोमवंशी, वैभव लंगर, बाळू नरवडे, अमोल सुर्यवंशी, महेश सांळुके ईत्यादीजन यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना, युवा सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments