औसा बाजार समिती निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने बांधली वज्र मूठ
औसा प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समिती औशाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने वज्र
मोठ बांधली असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या तिन्ही पक्षाने मिळून वज्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार असल्याचे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख, माजी मंत्री अमित देशमुख व काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, शिवसेनेचे खा.ओमराजे निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन ही निवडणूक सर्व शक्तीनिशी लढवून औसा कृषी उत्पन्न बाजार समिती महाविकास आघाडीच्या ताब्यात घेण्याचा ठाम निर्धार करून वज्रमुठ मजबूत असल्याचे यावेळी ॲड.श्रीपतराव काकडे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांनी पत्रकार परिषदेत संबोधित करताना सांगितले महाविकास आघाडीच्या माध्यमातून ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून सतीश रघुनाथ शिंदे, विठ्ठल गुरुप्पा बेळजवळगे, ग्रामपंचायत महिला मतदारसंघातून रूक्मीनबाई श्रीधर साळुंखे व शिवगंगा व्यंकट साळुंखे ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकातून नामदेव माणिक गायकवाड, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून बाबासाहेब सदाशिव गायकवाड, सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघातून नारायण लक्ष्मण लोखंडे, राजेंद्र हरिश्चंद्र भोसले, किशोर अरविंद जाधव, प्रकाश रघुनाथ भोंग, सचिन दगडू गिराम, ॲड.श्रीकांत शाहूराज सूर्यवंशी, दत्तोपंत दिगंबर सूर्यवंशी, सहकारी संस्था इतर मागास प्रवर्गातून तांबोळी अहमद महंमद , सहकारी संस्था भटक्या जमाती मतदार संघातून दिलीप विश्वनाथ लवटे तर हमालमापाडी मतदारसंघातून पाशा आमिन शेख यांना महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी देण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आली. औसा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तिन्ही पक्ष सर्व शक्ती पणाला लावून लढणार असून काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नसून वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच सर्व जाती धर्माला प्रतिनिधी व करण्याची संधी देत भौगोलिक क्षेत्राचाही विचार उमेदवारी देत असताना महाविकास आघाडीने केला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उदगे, अँड.श्रीपतराव काकडे, नारायणराव लोखंडे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, तालुकाप्रमुख सतीश शिंदे, बाजार समितीचे माजी उपमुख्य प्रशासक किशोर जाधव, काँग्रेसचे प्रदेश सचिव बसवराज धाराशिवे, राजेंद्र भोसले, मारुती महाराज साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्याम भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सुभाष पवार, ॲड.श्रीकांत सूर्यवंशी, बबनराव भोसले, विश्वास काळे, अरुण मुकडे, दिलीप लवटे, काँग्रेसचे सय्यद खादर, पाशा शेख, यांच्यासह अनेक मान्यवर व उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments