*आ. रमेशअप्पा कराड यांच्याकडून नियोजित रेणा नदी परिसरात होणाऱ्या घाट बांधकामाची केली पाहणी*
         
रेणापूर
 रेणापूर शहरालगत वाहणाऱ्या रेणा नदीवर घाटाचे बांधकाम आणि सुशोभीकरण करण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या पर्यटन विभागाअंतर्गत ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून सदरील नियोजित कामाची आ. कराड यांनी रविवारी नदीकाठ व परिसराची पाहणी केली.
         आदिशक्ती श्री रेणुका देवीच्या वास्तव्याने पावन झालेल्या रेणापूर शहरालगत वाहणाऱ्या रेणा नदीचे धार्मिक महत्व अनन्यसाधारण आहे. परंतू नदीपात्र काटेरी झुडपांनी वेढलेले असल्याने भक्तांना अडचणी येत होत्या. तीर्थक्षेत्र आणि नदीचे पावित्र्य जपण्यासाठी रेणापूरचे प्रथम नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांनी घाट बांधकामासाठी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्यानुसार आ. कराड यांनी राज्य शासनाकडून हा निधी मंजूर करून घेतला. लवकरच घाटाचे बांधकाम सुरू होणार आहे. यासंदर्भात आ.कराड यांनी पाहणी करून अनेक महत्त्वपूर्ण सुचना केल्या.
       यावेळी आ. रमेशआप्पा कराड यांच्यासमवेत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, रेणापूरचे पहिले नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, ओबीसी आघाडीचे मराठवाडा संघटक डॉ बाबासाहेब घुले, संगायो समितीचे अध्यक्ष वसंत करमुडे, सदस्य चंद्रकांत कातळे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश आंबेकर शहराध्यक्ष दत्ता सरवदे, श्रीकृष्ण पवार उज्वल कांबळे, राजू आलापुरे , हणमंत भालेराव, आजिम शेख, महादू राठोड, राजू धर्माधिकारी ,महेश गाडे, जगन्नाथ कातले, सचिन सिरसकर, रमेश चव्हाण, योगेश राठोड, व्यंकट आकणगिरे, महादू गोविंदपुरे, संतोष राठोड, शरद चक्रे, हरिभाऊ पांचाळ, धम्मानंद घोडके, उमाकांत कांबळे, पप्पू कूडके, सोपान सातपुते, रफिक शिकलकर , आवाझ कुरेशी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments