औसा शहराच्या तिसऱ्या टप्प्याच्या रस्ता रुंदीकरण साठी मुख्याधिकारी सरसावले
 औसा प्रतिनिधी 
औसा नगर परिषदेच्या हद्दीतील मुख्य रस्त्यावरील तिसऱ्या टप्प्याच्या रस्ता रुंदीकरणाचे काम मागील अनेक दिवसांपासून अनेक कारणाने रखडले होते. विविध राजकीय पक्षांनी व सामाजिक संघटनांनी आंदोलन व निवेदने देऊन तिसरा टप्पा पूर्ण करावा अशी मागणी केली होती, परंतु तिसऱ्या टप्प्याच्या रस्ता रुंदीकरणांमध्ये सातत्याने राजकीय हस्तक्षेप होत होता तसेच या कामाचे श्रेय घेण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले परंतु आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा शहरातील मुख्य रस्त्यावरील तिसऱ्या टप्प्याच्या रस्ता रुंदीकरणासाठी राज्य शासनाकडून 10 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून अखेर हे काम मार्गी लावले आहे. 10 दिवसांपूर्वी झालेल्या आढावा बैठकीमध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्यासह संबंधित मालमत्ता धारकांना बैठकीस बोलावून या बैठकीमध्ये शहराच्या विकासासाठी कुणी अडथळा करू नये असे आवाहन करण्यात आले. त्यानुसार व्यापारी वर्गाने संमती दर्शविल्यामुळे नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी या रस्त्यावरील कामाला गती देता यावी म्हणून जागेची मोजणी केली आहे. लातूर वेस हनुमान मंदिरापासून जामा मस्जिद पर्यंतचा हा तिसरा टप्पा आता लवकरच पूर्ण होणार असून या कामाला गती येत असल्याने स्वतः मुख्य अधिकारी अजिंक्य रणदिवे हेही या कामी सरसावले आहेत. मंगळवारी रस्त्यावर मोजणी करण्यासाठी मुख्याधिकारी तसेच भारतीय जनता पार्टीचे घटनेचे सुनील उटगे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments