रूपामाता चे अँड व्यंकटराव गुंड यांना आदर्श उद्योजक पुरस्कार 
औसा प्रतिनिधी
 रुपामाता उद्योग समूहाचे सर्वे  ॲड व्यंकटराव गुंड यांनी रुपामाता मल्टीस्टेट पतसंस्था, रूपामाता दूध उत्पादक संघ आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती निर्माण करता यावी म्हणून पाडोळी येथील कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळवून दिला आहे. औद्योगिक व आर्थिक क्षेत्रामध्ये ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी सातत्याने काम करीत असल्यामुळे या कार्याची दखल घेऊन छावा संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या 45 व्या जयंतीनिमित्त विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते ऍड व्यंकटराव गुंड यांना आदर्श उद्योजक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना ऍड गुंड म्हणाले हा पुरस्कार केवळ माझा नसून रुपामाता उद्योग समूहामध्ये काम करणाऱ्या शेवटच्या घटकापर्यंतच्या प्रयत्नाचे हे यश आहे असे  प्रतिपादन अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मेळाव्या मध्ये सत्कार प्रसंगी बोलताना केले. मेळाव्यासाठी औसा तुळजापूर व उस्मानाबाद तालुक्यातील शेतकरी व कामाचा उद्योग समूहाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments