इळेकर परिवाराची दावत -ए -इफ्तार पार्टी संपन्न..
औसा प्रतिनिधी 
मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असुन या रमजान महिन्यात मुस्लिम बांधव अत्यंत भक्ती भावाने कडक उन्हाळयाचे दिवस असताना रोजा उपवास करीत आहेत.त्या  निमित्ताने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गिरीष इळेकर व इळेकर परिवाराच्या वतीने  दावत-ए-इफ्तार  पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ह  से हिंदु  म  से मुसलमान...
हमसे सारा हिंदुस्थान...!
 हे ब्रिद वाक्य घेऊन  इळेकर परिवाराने 15 एप्रिल 2023 शनिवारी 23 व्या  रमजानच्या दिवशी  महाराज गल्लीतील गुरुकृपा निवास औसा येथे दावत -ए -इफ्तार पार्टी करण्यात आली.या रोजा इफ्तार पार्टीत रोजदारांनी एकत्र बसून खजुर, फळे,ज्यूस घेऊन रोजा (उपवास) सोडला.त्यानंतर गुरुकृपा निवास च्या प्रांगणात मुस्लिम बांधव नमाज पठण करून अल्लाह कडे प्रार्थना केली.
यावेळी दावत -ए -इफ्तार पार्टीत आलेल्यांनी इफ्तार पार्टी चा आंनद घेतला.यावेळी मोठ्या संख्येने रोजदार सहभागी झाले होते.यावेळी इळेकर परिवाराच्या वतीने मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान च्या शुभेच्छा देण्यात आल्या.
  यावेळी दावत-ए-इफ्तार पार्टीत मौलाना कलीमुल्ला व अँड समियोद्दीन पटेल, माजी नगराध्यक्ष  खादर सय्यद, पाशा भाई शेख,वहीद कुरेशी, शब्बीर भाई शेख, मुख्तार कुरेशी, शेख सनाउल्ला दारूवाले, याच्यासह हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते!

Post a Comment

0 Comments