भारत बौध्दमय बनणे डॉ. बाबासाहेब आंबेडकराची अपेक्षा हीच आजच्या काळाची गरज आहे.


दिनांक 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती अती (उत्साहाने) देशातच नव्हे सर्व जगामध्ये साजरी होते ही अत्यंत आनंदाची आणि स्वाभिमानाची बाब आहे. या महामानवाच्या जयंती दिनाच्या निमित्ताने त्यांच्या प्रखर जिवंत ज्वलंत प्रखर राष्ट्रवादी विचाराची सतत पेरणी होऊन ते विचार प्रत्येक भारतीयांच्या मनात रुजविणे ही आजच्या काळाची गरज आहे. दिनांक 14  आक्टोंबर 1956  साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी 'न भुत्तो न भविष्याति अभुतपूर्व' अशी धर्मांतराची धम्मक्रांती घडवून आणली. 5 लाखाहून अधिक अस्पृश्यादी दलिताना बौध्द धम्माची दिक्षा दिली. या कृतीला इतरत्र तोड नाही. ही जागतिक विक्रमी नोंद ठरली. धर्मांतराची प्रक्रिया पुर्ण झाली. 22  प्रतिज्ञा सर्वाकडून वदवून घेतली आणि डॉ. बाबासाहेब आंबडेकर स्टेजवरुन खाली उतरल्यानंतर सर्व पत्रकारानी त्यांना घेरले आणि पत्रकरानी प्रश्न विचारला. बाबासाहेब तुम्ही आता बौध्द झालात याची ओळख काय ? डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी तात्काळ उत्तर दिले. जो नीतीमान तो बौध्द. बौध्द धर्म स्विकारण्याचा मागचा मुख्य उद्देश भारत राष्ट्र नितीमान राष्ट्र बनले पाहिजे. यामागच्या इतिहासाचा डॉ. बाबासाहेब आंबडेकरानी मागोवा घेतला.  तिनशे वर्ष मोगलाची आणि दिडशे वर्षे ब्रिटीशाची गुलामीमुळे हा देश गरीब विकलांग आणि कंगाल दुर्बल बनला होता. या देशातील तत्कालीन जनता आपसातील अंतर्गत कलंह चातुर्ववर्ण्य व्यवस्था जातीयता, धार्मिकता, अंधश्रध्दा रुढी पंरपरा मुळे हा देश सतत गुलामीत राहिला, त्यातील मुख्य कारण आपसात फंदफितुरीमुळे या देशाला कायमचा पराभूताचा इतिहास म्हणून सर्वत्र ओळख पटली होती. या अपयशाचा पराभूताचा कलंक धुवून काढण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबडेकरापुढे बौध्द धम्मा हाच पर्याय होता. 18 पगड जाती जमातीनी बनलेला हिन्दुधर्म हा एकसंघ समाज निर्मिती एकसंध राष्ट्र निर्माण घडू शकत नाही म्हणून डॉ. बाबासाहेब आंबडेकरानी अखंड भारताचे राष्ट्रीयत्व जाती धर्मनिष्ठ नसावे राष्ट्र निष्ठच असावे म्हणून मी प्रथम भारतीय आहे, आणि 

भारतीयच राहाणार हा खरा जिवंत ज्वलत प्रखर राष्ट्रवादाचा आदर्श आज प्रत्येक भारतीयानी घेणे हीच आजच्या काळाची गरज आहे. भारतीय राज्य घटना देशाला अर्पण करताना समारोप भाषणाच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी खंत व्यक्त केली होती. मोठ्या कष्टाने त्यागाने, आत्मबलिदानाने प्राणाची आहुती देऊन मिळविलेले स्वराज्य आपसातील फंद फितुरीमुळे गमावण्याची पाळी येऊ नये स्वातंत्र्याचे रक्षण व्हावे. जडण घडण व्हावी भ्रष्टाचार मुक्त भारत आणि नैतिक आधिष्ठान आधारित बौध्द धम्मा चा पाया भर भक्कम रोवला गेला,तर ख-या अर्थाने स्वातंत्र्याचे रक्षण केल्याचे सार्थक होईल. स्वातंत्र्या प्राप्तीनंतर स्वातंत्र्य वट वृक्षाला अमृताची फळे येतील असे अपेक्षीत होते. परंतु  भ्रष्टाचाराच्या विषारी फळा फुलांने या देशात बहार आलेला आहे. राष्ट्राच्या मृत्यूचे कारण भ्रष्टाचार हे माहित असुन ही भ्रष्टाचाराच्या विषारी फळानी हा देश बहारुन आलेला आहे. सत्तेवर आलेली सरकारे तुमच्या काळात एवढा भ्रष्टाचार झाला आम्ही धुतल्या तांदळासारखे आहोत असे एकमेकावर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. गो हती येथे 50  कोटी खोके काय झाडी, काय डोंगर, सर्व ओके. जाहीरपणे भ्रष्टाचाराची जाहीर कबुली दिली.
  याबदल ही सत्ता म्हणजे सत्ता धुंद, सत्ता बेधुंद असते सतामदांन्ध असते हे सिध्द होतंय, ही आपसातील माजलेली दुही म्हणजे आजची उदयाची पराभुताची नांदी ठरु शकते.

सत्ता संघर्षाचा दुसरा प्रकार म्हणजे राष्ट्रीय पुरुष महामानव स्वातंत्र्यवीर यांचा आवमान करणे, कमी लेखने पाहणे, टिंगल टवाळी करणे. मानवी मनाच्या अधोगतीची लक्षणे आहेत. मागील पारतंत्र्यात घडलेल्या घटनाना किंवा मेलेली मढी उकरुन काढणे यात यांचा कोणता पराक्रम पुरुषार्थ आहे याचा उलगडा  होत नाही जे चांगले घेण्यासारखे आहे ते घ्यावेत बाकी  विकृत सोडून द्यावे  त्याचा उहापोह होऊ नये यातच शांहणपणा आहे.

बाबासाहेब म्हणाले होते मी जे हे लोकशाही समाजवादी समाज रचनेचे (संसद भवन) सुंदर असे ध्येय मंदिर उभारलेले आहे त्यांत पवित्र भावनानी आत प्रवेश केला पाहिजे या पवित्र मंदीरात भुते नाचू लागली तर हे मंदिर उध्वस्थ झाले शिवाय राहणार नाही म्हणून या पवित्र ध्येय मंदिराचे रक्षण
झाले पाहिजे अन्यथा थेरे माझ्या मागल्याप्रमाणे
कायमचे कुणी तरी परकीय शक्ती टपून बसलेली असते याचे ध्यान आणि भान ठेवण्याची खरी गरज आहे. महामानवांना राष्ट्रीय पुरुषांना संतमंहतांना जाती धर्माच्या समू गटांनी आपापल्या गटामध्ये ओढून ताणून ठेवले आहे.प्रत्येकाला याचारास्त अभिमान आहे.आमच्या जातीधर्माच्या नेत्यांना कुणी नावे ठेवू नये केवळ आपल्या श्रेष्ठत्वापायी इतरांना कमी लेखलेले चालते पण विशिष्ट जाती धर्माच्या राष्ट्र पुरुषा वाषयी कुणी ब्र शब्द काढू नये हा मालकी हक्क कुणी दाखवू नये किरतनकारामध्ये ही एकच हल्लकल्लोळ, गदारोळ उठला होता.
ज्ञानेश्वरांनी निर्जिव भिंत चालवली,रेड्यामुखी वेद वदविले अशी काही आक्षेपार्ह विधानांनी सर्वत्र गडबड गोंधळ उडाला होता.रेड्यामुखी वेद वदविले.परंतू बहुजन समाजातील माणसासारख्या माणसांना शिक्षणापासून वंचित ठेवले ही सूर्य प्रकाशा इतके स्पष्ट असताना उगीचच पोटशुळ उठवून आगपाखड केली गेली. रेड्यामुखी वेद वदविला याच राग मनात मनी आला.परंतू वेदाचा अभ्यास शुद्ध शंबुक करतो म्हणून त्याच्या कानात तप्त शिशाचा रस ओतला शिरछेद केला हे मर्यादा पुरुषोत्तम रामाचे अमानवीय कृत्ये का सांगितले गेले नाही.
निर्जिव भिंत चालविल्याचा आंनद होतो.आणि जिवंत माणसांना शिक्षणापासून वंचित ठैवल्याचा राग का यावा.या सा-या बाबी आकलनाच्या बाहेर आहे.पुराणातील वांगी पुराणातच ठेवणे यातच अतिशाहाणपणाचे ठरावे.स्वांतत्रवीर सावरकरांना माफीवीर संबोधल्या वरुन सावरकर गौरव यात्रा देशात निघतात फुले कर्मवीर भाऊराव पाटलांनी भीक मागून शिक्षण संस्था उभारल्या चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानाबद्दल कुणी त्याचा जाहीर निषेध केला नाही.समता पर्वात असमानता का?असे प्रश्न उपस्थित होतात.स्वातंत्र भिक मागून मिळविले.खरे स्वातंत्र हे 2014 पासून मिळाल्याचा वलगना केल्या गेल्या,मुळातच ख-या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस अण्णाभाऊ साठे म्हणाले होते,यह आझादी झुठी है,देशकी जनता भुखी है! 
नामदेव ढसाळ ही म्हणाले होते, स्वातंत्र्य म्हणजे कंचा गाढवीचे नाव स्वराज्य नको सुराज्य हवे असेही त्याकाळात क्रिया  प्रतिक्रिया उमटल्या होत्या.आज लोकशाहीला भांडवलशाहीने विकत घेतले आहे.परवा दैनिक संचार दिनांक 5 एप्रिल 2023 च्या अंकात एका प्राध्यापक सचिन जाधव कासेगाव यांनी माझे मत या सदराखाली बातमी प्रकाशित केलेली वाचनात आली होती.लोकप्रतिनिधी तुपाशी जनता उपाशी,अशा आशयाच्या बातमीवरुन खरोखर लोकप्रतिनिधीकडे म्हणजे आमदार, खासदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, राजकारणी लोकाकडे एवढी अफाट संपत्ती आहे की त्यांच्या सातपिढ्या काहीही कष्ट न करता,घाम न गाळता बसून खाल्ले तरी आकडे वारीमध्ये असलेली संपत्ती संपणार नाही.भरमसाठ प्रकारच्या सोयी सवलती या लोकप्रतिनिधींना सरकारकडून पुरविल्या जातात यांना लाखाच्या घरात पगार असतो.रेल्वे प्रवास, विमान प्रवास फुकट असतो आणि अनेक प्रकारचे भत्ते वेळेस मिळून आले की, मरेपर्यंत पेन्शन मिळते आणि 2005 पासून शिक्षकांना कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू करा म्हणून संप बंद, मोर्च रस्त्यावर उतरावे लागते.समता पर्वात ही असमानता का ? याच शहानिशा व्हावी.  
शासकीय निमशासकीय कर्मचा-याचे महिनासाठी मिळणारे वेतन हे ही कधी वेळेवर मिळत नाही. वेळोवेळी वाढणारा महागाई भत्ता हे प्रलंबित ठेऊन कधीच वेळोवर मिळू शकत नाही. थकबाकीच्या रक्कम देण्यास यांचेकडे बजेटच नाही अशी दरमहाची बोंबाबोंब आहे. विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीच्या रक्कमा, विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रिया या सा-या आधार कार्ड, पॅनकार्ड, स्मार्टकार्ड डिजिटल इंडिया, स्मार्ट इंडिया या सर्व गोडस नावाखाली सर्वसामान्य जनतेच्या पैशाची लय लुट, लुटमार चालू आहे. गॅस सिलेन्डरच्या किमती ११४० पर्यत पोहंचल्याने सर्व सामान्य जनता चुल पेटवायची  वाट पहात असताना चिमणीभर रॉकेल ही मिळू शकत नाही. राज्यातील रॉकेलही या सत्ताधा-यानी गायब केले. शिधापत्रिकेवरील मिळणारे धान्यही बंद केले. घरात नाही दाना खिशात नाही आणा आणि डिजिटल इंडिया म्हणा यात सबका साथ सबका विकास मन की बात अच्छे दिन आणे वाले है ना खाऊंगा ना खाने दुंगा या सर्व पोकळ घोषणा फालतू व त्याना फुकटची खोटी आश्वासने यामुळे या देशातील गोरगरीब सामान्य जनता जीवन जगणे अनिवार्य म्हणून सर्वसामान्य माणुस जीवन जगतो आहे. डॉ. बाबासोब आंबेडकराना या सर्व बाबी अभिप्रेत नव्हत्या. स्वच्छ भारत सुंदर भारत नैतिक अधिष्ठानावर उभाराहू शकतो. 'यही पस्सिको' या आणि प्रत्यक्ष पहा तेच सत्य माना कुण्या ग्रंथात सांगितले म्हणून सत्य मानू नका त्याचे
बौध्दिक कसोटीवर पडताळणी करुन पहा तुमच्या बुध्दीला पटले तर सत्यमाना म्हणून सत्यावर आधिारित धम्म  म्हणजे नीती आणि निती म्हणजे धम्म, नैतिक अधिष्ठान म्हणजे सर्वश्रेष्ठ अधिष्ठान, बौध्द धम्माशिवाय इतरत्र धम्मग्रंथामध्ये नाही म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकराची आपेक्षा भारत बौध्दमय बनविण्याची नितांत गरज होती ती पुर्ण व्हावी यातच भारताचे कल्याण आहे. •भवतु सब मंगलम असे म्हणावेसे वाटते. 

उध्दव एन. लोंढे 

राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक 
बौध्दाचारय 
समता नगर, औसा मो.नं. ७३५०४५७४२३

Post a Comment

0 Comments