*डिजिटल दुनियेचा स्ट्रॉंग पासवर्ड – एमएस-सीआयटी*

कोरोंनाने दुनिया बदलली. प्रत्येक क्षेत्रात मोठे बदल झाले. शिक्षण, आरोग्य, संवाद, शेती, व्यापार अशा सर्वच क्षेत्रात आय टी चा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. ऑनलाईन व्यवहार सुरू झाले. पाहता पाहता दोन वर्षात संपूर्ण दुनिया डिजिटल झाली. शाळेतील पोरंसुद्धा मोबाईल आणि कम्प्युटरवर शिकू लागली. चहाच्या टपरीवर देखील पैसे घेण्यासाठी QR कोड दिसायला लागला. यू ट्यूब वरुन विविध रेसिपी शिकून घरोघरी नवनवीन खाद्यपदार्थ बनवणे सुरू झाले. आजीसुद्धा नातवाशी व्हिडिओ कॉल करून बोलायला लागली. प्रत्येक क्षेत्रात काम करणारी मंडळी मोबाईल, कम्प्युटर आणि इंटरनेट या तीन गोष्टींच्या सहाय्याने आपले काम कसे करता येईल ? यासाठी धडपडू लागली आणि त्यामध्ये यशस्वीदेखील झाली. 

मोबाईल, कम्प्युटर आणि इंटरनेट या तीन गोष्टींचा समाजातील वापर वाढला. मात्र त्यानंतर या तीन गोष्टींचा प्रभावी आणि परिणामकारक वापर करण्याची कौशल्ये शिकण्याची आवश्यकता वाटू लागली. डिजिटल माध्यमे वापरुन आपल्या दैनंदिन व्यवहारात आणि कामात चांगलीच मदत होते हे जाणवल्यामुळे आता प्रत्येकजण मोबाईल, कम्प्युटर आणि इंटरनेट वापरण्याची कौशल्ये शिकू लागला आहे. 

एमकेसीएल म्हणजेच महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित, पुणे मागील दोन दशकांपासून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना डिजिटल साक्षर आणि डिजिटल सक्षम बनविण्याचे काम करीत आहे. एमएस-सीआयटी या लोकप्रिय कोर्सच्या माध्यमातून आतापर्यंत महाराष्ट्रातील दीड कोटीहून अधिक जणांना एमकेसीएलने डिजिटल साक्षर आणि डिजिटल सक्षम बनवले आहे. बदलती टेक्नॉलॉजी, शिक्षणव्यवस्था आणि वापरकर्त्याची गरज लक्षात घेऊन दरवर्षी एमएस-सीआयटी कोर्समध्ये बदल घडवून आणले जातात. या वर्षी एमएस-सीआयटी कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना अभ्यासासाठी डिजिटल स्किल्स प्रभावीपणे कशी वापरायची ? स्मार्ट टायपिंग आणि वॉइस टायपिंग कसे करायचे ? प्रोजेक्ट रिपोर्टसाठी ग्राफ्स कसे तयार करायचे ? प्रभावी प्रेझेन्टेशन्स काशी तयार करायची ? विविध फॉर्म्स कसे तयार करायचे ? सुंदर पोस्टर कसे डिझाईन करायचे ? आपल्या घरातील किंवा ऑफिसमधील इव्हेंटसचे फोटो अल्बम कसे तयार करायचे ? अशा अनेक गोष्टी शिकता येणार आहेत. सध्या वापरात येणाऱ्या या विविध कौशल्यांसोबतच नवीन एमएस-सीआयटी कोर्समध्ये मशीन लर्निंग, बिग डेटा, ऑगमेंटेड रिअॅलिटी, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, 3 D प्रिंटिंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, व्हर्चुअल रिअॅलिटी अशा चौथ्या औद्योगिक क्रांतीमधील तंत्रज्ञानाची ओळखदेखील करून दिली जाते. यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक पुढे निर्माण होणाऱ्या करिअर्सविषयी जागरुक होतात आणि त्यादृष्टीने आपल्या शिक्षणाची दिशा ठरवू शकतात. 

एमकेसीएलच्या नवीन एमएस-सीआयटी कोर्समध्ये विद्यार्थ्यांना विंडोज १० आणि MS Office २०१९ ची आधुनिक फीचर्स शिकायला मिळतातच परंतु त्यासोबतच कम्प्युटर आणि स्मार्टफोन स्किल्स, स्मार्ट टायपिंग स्किल्स, ऑफिस प्रॉडक्टिव्हिटी स्किल्स, डिजिटल इंडिया स्किल्स, जॉब रेडीनेस स्किल्स, स्टडी स्किल्स, कोडिंग स्किल्स, सोशल मीडिया स्किल्स, सायबर सेक्युरिटी स्किल्स, Go Green म्हणजेच पर्यावरण वाचविण्यासाठीची स्किल्स आणि कम्प्युटर व मोबाईल वापरण्याचे शिष्टाचारदेखील शिकायला मिळतात. या सर्व गोष्टींमुळेच डिजिटल दुनियेचा स्ट्रॉंग पासवर्ड म्हणजेच एमएस-सीआयटी असे म्हटल्यास वावगे ठरू नये. *चला तर मग, एमएस-सीआयटी कोर्स शिकून तुम्ही मिळवणार ना डिजिटल दुनियेचा स्ट्रॉंग पासवर्ड* ?

- *महेश पत्रिके* 
विभागीय समन्वयक,
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL)

Post a Comment

0 Comments