जय मल्हार सेनेच्या लातूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक 
लातूर 
जय मल्हार सेनेचे सरसेनापती मा.लहुजी शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली व जेष्ट नेते प्राचार्य एल.टी.केसाळे, जिल्हा प्रमुख पांडुरंग लोकरे,जिल्हा संपर्क प्रमुख संतोष गडदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न शासकीय विश्राम ग्रुह चाकुर येथे जय मल्हार सेनेच्या लातूर जिल्ह्यातील पदाधिकार्यांची बैठक संपन्न झाली. लवकरच कारेपुर येथे धनगर समाजाचा जिल्हा स्तरावरील जागृती मेळावा घेण्याचे सर्वानुमते ठरले.                       यावेळी लातूर जिल्ह्यातील जय मल्हार सेनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.जय मल्हार सेना लातूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून श्री तेजेराव खटके,जिल्हा संपर्क प्रमुखपदी श्रीकांत हाके,जिल्हा सल्लागारपदी श्री सखाराम होळकर ,चाकुर तालुका अध्यक्षपदी इंद्रजित कवठे,रेणापुर तालुका अध्यक्षपदी श्री शंकर घोडके,चाकुर तालुका उपाध्यक्षपदी श्री रामेश्वर सुरवशे,रेणापुर तालुका सचिवपदी श्री लहु मदणे,तर अहमदपूर तालुका सरचिटणीसपदी ज्ञानेश्वर बनसोडे यांची निवड करण्यात आली.बैठकीला सचिन एनकफळे,चंद्रकांत नेवाळे,महेश भिंगोले,अजय होळकर,व्यंकोबा वागलगावे,दुशंन्त काळे,मलिकार्जुन वागलगावे,खडके,किशन सोमवंशी सह मोठ्यासंख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments