सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या हस्ते सदगुरु गुरु बाबांचा सन्मान 

औसा प्रतिनिधी
औसा येथील संत वीरनाथ मल्लिनाथ महाराज संस्थांचे सदगुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा राज्य सांस्कृतिक पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष सदगुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई येथील मंत्रालयामध्ये प्रदान करण्यात आला. सदगुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांनी अध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केले. भागवत धर्माची पताका साता समुद्राच्या पलीकडे घेऊन जाण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. कीर्तन प्रवचन आणि दिव्य चक्रीभजनाच्या माध्यमातून सद भक्तांना अध्यात्माची शिकवण देण्याचे सुरू असलेले त्यांचे अविरत कार्य या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने यावर्षीचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार त्यांना दिला. याप्रसंगी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव व विविध मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कारामुळे महाराष्ट्र राज्यातील संत सांप्रदाया मधून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments