ग्रंथ वाचनाने माणसाला बौद्धिक समृद्धी येथे प्राचार्य सोमनाथ रोडे यांचे प्रतिपादन 
औसा (प्रतिनिधी)दि.१
 ग्रंथासारखा सर्वश्रेष्ठ दुसरा गुरु नाही प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान आत्मसात करायचे असेल तर त्यासाठी लागणारे संदर्भ ग्रंथ हेच मूळ आधार असून ग्रंथ वाचनाने माणसाला बौद्धिक समृद्धी प्राप्त होते असे प्रतिपादन प्राचार्य सोमनाथ रोडे यांनी केले.
 औसा येथील मुक्तेश्वर मंगल कार्यालयामध्ये आयोजित लातूर जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाच्या 38 व्या वार्षिक अधिवेशनामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. लिखित साहित्याची जागा कोणतीही इलेक्ट्रॉनिक माध्यमे घेऊ शकत नाहीत असे सांगून  रोडे पुढे म्हणाले की वाचन संस्कृती ही टिकलीच पाहिजे वाचनामुळे बौद्धिक प्रगल्भता वाढीस लागून माणूस कोणाचाही हस्तक बनणार नाही वाचणारा माणूस तो विचाराने कुणाचाही हस्तक होऊ शकत नाही माणसाने जमिनीपासून अंतराळापर्यंत केलेली प्रगती याचा मूळ आधार वाचन आहे. त्याशिवाय कोणत्याही क्षेत्रातले संशोधन शक्य नाही असे सांगून कोलकाता येथे झालेल्या बुक फेस्टिवल मध्ये तब्बल 25 कोटी रुपयांची ग्रंथसंपदा विकली गेली हे विसरता येणार नाही. याप्रसंगी त्यांनी प्रसिद्ध साहित्यिक हो ना आपटे, आचार्य अत्रे. राजाराम मोहन रॉय यांची उदाहरणे प्रस्तुत केली.
 *ग्रंथालयाचे प्रश्न सोडविण्यासाठी मी वकिली करतो*
 ----आमदार अभिमन्यू पवार
 जिल्हा ग्रंथालय संघाच्या 38 व्या अधिवेशन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलताना अभिमन्यू पवार म्हणाले की ग्रंथालय चळवळ गतिमान होण्यासाठी ग्रंथालयाचे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी मी मोफत वकिली करण्यासाठी वचनबद्ध आहे ग्रंथालयाचा दर्जा वाढविण्यासाठी तसेच 20 टक्के अनुदान व 60% वरील अनुदान शंभर टक्के करण्यासाठी राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे मी पाठपुरावा करण्यासाठी वचनबद्ध आहे. ग्रंथालय संघाच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन मी शासन दरबारी ग्रंथालयाचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक क्षेत्रातील समस्या जाणून घेऊन हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे हे लोकप्रतिनिधीचे आद्य कर्तव्य आहे असे सांगून आमदार पुढे म्हणाले की ग्रामीण भागातील काही ग्रंथालय व कार्यक्षम असून ग्रंथालय चालकांनी प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे. असेही शेवटी त्यांनी स्पष्ट केले प्रारंभी ग्रंथालय चळवळीचे प्रणेते रंगनाथन आणि औसा तालुक्याचे भूमिपुत्र व लातूर जिल्हा ग्रंथालय चळवळीचे प्रणेते स्वर्गीय त्रिंबकदास झंवर  यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध कॅन्सर रोग तज्ञ ब्रिज मोहन झंवर,  डॉ गजानन कोठेवार, स्वागत अध्यक्ष सतीशचंद्र बाजपाई,  जिल्हा कार्याध्यक्ष हावगीराव बिरखेडे,  कोषाध्यक्ष प्रभाकर कापसे, महादेव खिचडे,  धनंजय कोपरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर कापसे यांनी करून ग्रंथालय क्षेत्रामध्ये येणाऱ्या अडचणीची माहिती उपस्थितांच्या समोर निषेध केली याप्रसंगी डॉ गजानन कोठेवार यांनीही ग्रंथालय चळवळीला उचित अवस्था प्राप्त करून देण्यासाठी लोकप्रतिनिधींचा सहकार्य अत्यंत गरजेचे असून येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक आमदार व खासदार यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करणार आहोत असे स्पष्ट केले, या अधिवेशनामध्ये स्वर्गीय 
त्रिंबकदास झंवर आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार गजानन कोटेवार वर्धा यांना तर जिल्हास्तरीय स्वर्गीय मारुतीराव चिरके आदर्श ग्रंथपाल पुरस्कार सूर्यकांत जाधव आलमला यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विकास वाचनालय औसा यांनी या अधिवेशनाचे आयोजन उत्कृष्ट रित्या केले होते. कार्यक्रमासाठी लातूर व बीड जिल्ह्यातील ग्रंथालयाचे संचालक तसेच ग्रंथपाल यांच्यासह ग्रंथालय चळवळीशी निगडित शेकडो ग्रंथालयीन महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीसी पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments