अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांचे धावपळ 
औसा प्रतिनिधी 
हवामान खात्याने 7  ते 9  एप्रिल 2023 दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज वर्तुळला असल्यामुळे शेतकरी वर्गाची धावपळ उडाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील रब्बी हंगामातील पिकाची कापणी काढणी मळणी यंत्राद्वारे हरभरा, गहू, ज्वारी, करडी इत्यादी धान्याच्या राशी करण्याचा मौसम सध्या सुरू असून शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली आहे. दोन दिवसापासून ढगाळ वातावरण व अधून मधून पावसाच्या हलक्या सरी तुरळक ठिकाणी पडल्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील कापून ठेवलेली ज्वारी ज्वारीचे कणीस गव्हाचे कार्ड तसेच हरभऱ्याचे कापणी करून लावलेले ढेप भिजण्याचे शक्यता आहे.तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील कडबा भिजणार असल्याने पशुधनाची ही अडचण होत असल्यामुळे शेतकरी वर्गात चिंता पसरली आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामामध्ये सर्वाधिक हरभरा पिकाची लागवड केली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात हरभरा, ज्वारी, गहू ही पिके उभे आहेत, तर काही शेतकऱ्यांनी कापणी केलेली पिके भिजणार असल्याने शेतकरी कापणी केलेले पिकांची ढिगारे लावून ताडपत्री व प्लास्टिकच्या साह्याने सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची एकच गडबड उडाली आहे, तसेच अधून मधून वादळ, वारे उठत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील आंब्याचा मोहोर व कैऱ्या पडत आहेत. फळबागा व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसह द्राक्ष बागा उत्पादक शेतकऱ्यांची ही अवकाळी पावसामुळे गैरसोय होणार असून शेतकरी वर्गाला सतत नैसर्गिक संकटाचा सामना करण्याची वेळ आली आहे.

Post a Comment

0 Comments