माजी नगरसेवक गुलाब शेख यांचे निधन 
औसा प्रतिनिधी
 औसा येथील काँग्रेसचे कार्यकर्ते व  माजी नगरसेवक गुलाब सुलतान शेख वय 60 वर्षे यांचे मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी पहाटे 4 च्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सय्यद सादात दर्गा कब्रस्तान औसा येथे मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीसाठी वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाष आप्पा मुक्ता, चंद्रशेखर पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील मिटकरी, अमर खानापुरे, डॉ नजीर अहमद शेख, अजित मुसांडे, रामभाऊ जोगदंड, सदानंदप्पा शेट्टे, राजीव कसबे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख शकील, सेवानिवृत्त पेशकार शेख हन्नान यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर नातेवाईक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments