औसा येथे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी 

औसा प्रतिनिधी

 सत्यशोधक समाजाचे जनक थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सार्वजनिक जयंती निमित्त माळी सेवा संघाच्या वतीने येथील संत सावता माळी चौक येथे सकाळी दहा वाजता प्रतिमेचे पूजन करून महामानवाला अभिवादन करण्यात आले महात्मा फुले यांच्या कार्याची ओळख समाजाला व्हावी म्हणून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे विद्यार्थ्यांनी विचार व्यक्त केले तसेच माळी सेवा संघाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेऊन पन्नास रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग नोंदविला सायंकाळी 6 वाजता  औसा शहरातील मुख्य रस्त्यावरून महात्मा फुले यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह माळी सेवा संघाचे सर्व पदाधिकारी तसेच समाज बांधव व फुले प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments