आंबेडकर जयंती निमित्त औसा येथे 50 रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
औसा प्रतिनिधी
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त औसा येथील सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ध्वजारोहण प्रतिमा पूजन, बुद्ध वंदना, संगीत, खुर्ची व रांगोळी स्पर्धा व व्याख्या विविध गुणदर्शनचा सांस्कृतिक कार्यक्रम यासह विविध क्रमाने उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. मंगळवार दिनांक 18 एप्रिल रोजी शासकीय रुग्णालय लातूर येथील ब्लड बँक आणि बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 50 युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव कल्पनाताई डांगे, जयंती समितीचे अध्यक्ष आशिष बनसोडे, उपाध्यक्ष आनंद बनसोडे, सचिव शरद बनसोडे, समता सैनिक दलाचे धम्मदीप डांगे, बालाजी बनसोडे, अशोक बनसोडे, शुभम बनसोडे, अनिल कांबळे इत्यादींनी रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
0 Comments