भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त जेष्ठ कार्यकर्त्यांचा औसा येथे सत्कार 
औसा प्रतिनिधी 
भारतीय जनता पार्टी पक्षाची स्थापना 43 वर्षांपूर्वी झाली होती. गुरुवार दिनांक 6 एप्रिल रोजी आमदार अभिमन्यू पवार यांच्या संपर्क कार्यालयामध्ये दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, दिवंगत राष्ट्रीय नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते करून पक्षाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम करण्यात आला. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या पक्ष संघटन कार्यामध्ये निष्ठेने काम करणाऱ्या जेष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते शाल श्रीफळ व फेटा तसेच प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, महिला आघाडीच्या प्रदेश सचिव कल्पना डांगे, शहराध्यक्ष लहू कांबळे, पप्पू भाई शेख, भीमाशंकर मिटकरी, शिवरुद्र मुरगे यांच्यासह भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वश्री सुशील कुमार बाजपाई, ॲड अरविंद कुलकर्णी, संदिपान जाधव, माधव सिंह परिहार, राम कांबळे, तुकाराम सूर्यवंशी, नागनाथ गंजुरे, निवृत्ती कटके, वीरभद्र कोपरे, गंगाधर भंडारी, संजय भंडारी, वाघन औसेकर, व्यंकट नाना मोरे, दिगंबर माळी, संदिपान जाधव, बाळकृष्ण वैजवाडे यांच्यासह अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments