औसा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन 

औसा प्रतिनिधी 

औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या दालनात ठिय्या मांडल्यानंतर औसा शहरासाठी पाणीपुरवठा करणारे बंद करण्यात आलेले बोरवेल सुरू करा यासाठी आज दिनांक 3 एप्रिल सोमवार रोजी नगरपालिकेच्या दालनात मनसे आणि सर्वपक्षीय नेते व पदाधिकाऱ्यांच्या ठिय्या आंदोलन करण्यात आले.या आंदोलनास औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी प्रतिसाद देत शहरातील सर्वच्या सर्व बोरवेल सुरू करण्याचे आदेश दिले. त्या पैकी काही बोरवेल पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.याप्रसंगी मनसेचे लातूर जिल्हा अध्यक्ष शिवकुमार नागराळे,शिवसेनेच्या नेत्या जयश्रीताई उटगे,काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख शकील, राष्ट्रवादीचे संगमेश्वर उटगे,मा. पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव,मनसेचे जिल्हा सचिव धनराज गिरी,तालुका अध्यक्ष मुकेश देशमाने,विधानसभा संघटक महेश बनसोडे,तालुका संघटक रामप्रसाद दत्त,शहराध्यक्ष प्रवीण कठारे, कृषीचे तालुकाध्यक्ष गोविंद चव्हाण,तानाजी गरड,गुणवंत लोहार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments