भंगेवाडी शिवारात वीज पडून 3 जनावरे ठार
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील भंगेवाडी शिवारामध्ये गुरुवार दिनांक 27 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. याप्रसंगी विजांचा प्रचंड कडकडाट होत भंगेवाडी शिवारातील बब्रुवान कंदगुळे यांच्या शेतात वीज पडल्यामुळे त्यांच्या शेतातील दोन बैल आणि एक गाय ठार झाल्याने गरीब शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या पिकाचे खळे झाल्यानंतर शेतकरी पेरणीपूर्व मशागतीला लागतो. पेरणीपूर्व मशागतीच्या तोंडावरच बब्रुवान कंदगुळे यांच्या शेतातील बैल तसेच दुपती गाय वीज पडून ठार झाल्यामुळे या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले. वीज पडून एकाच शेतकऱ्याची तीन जनावरे दगावल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 Comments