सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत औसा येथे इफ्तार पार्टी
औसा प्रतिनिधी
मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून 22 एप्रिल 2023 रोजी येऊ घातलेल्या ईद उल फित्र निमित्त मुस्लिम बांधव अत्यंत भक्ती भावाने कडक उन्हाळ्याचे दिवस असताना रोजा उपवास करीत आहेत. रमजान महिन्याच्या शुभेच्छा देऊन उपवास करणाऱ्या मुस्लिम बांधवांसोबत चर्चा करण्यासाठी सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी दिनांक 14 एप्रिल 2023 शुक्रवार रोजी हाश्मी फंक्शन हॉल येथे मुस्लिम बांधवांसोबत इफ्तार पार्टीचा आनंद घेतला. त्यांच्या समवेत माजी आमदार त्रिंबक नाना भिसे, शेषेराव पाटील,काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे, बँकेचे माजी अध्यक्ष ऍड श्रीपतराव काकडे, तालुका अध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, शहराध्यक्ष शेख शकील, मौलाना कलीमुल्लाह, अँड समियोद्दीन पटेल, अजहरुल्ला हाशमी, आदमखां पठाण, अँड शाहनवाज पटेल, अँड फैय्याज पटेल,माजी नगरसेवक अंगद कांबळे, अल्पसंख्याक चे शहराध्यक्ष हाजी सय्यद अब्दुल हमीद,माजी नगराध्यक्ष खादर शेख,अनिस जहागीरदार,पाशा शेख, इस्माईल शेख, शेख सनाऊल्ला दारुवाले, श्याम भोसले, विलासराव देशमुख युवा मंचचे तालुकाध्यक्ष रवी पाटील, शहराध्यक्ष खुंदमीर मुल्ला, मुजम्मील शेख, हमीद सर,गितेश शिंदे, शिवसेना शहरप्रमुख सुरेश भुरे,फय्युम शेख, यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईद अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात सर्व धर्मीयांनी मिळून साजरा करावा व या सणानिमित्त सामाजिक सलोखा राखण्याचे कार्य औसा तालुक्यातील जनता निश्चित करेल अशी अपेक्षा माझी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केली.
0 Comments