आधार प्रतिष्ठानच्या वतीने भादा येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन
 औसा प्रतिनिधी 
आधार प्रतिष्ठान भादा यांच्यावतीने जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती, भगवान परशुराम जयंती, अक्षय तृतीया व पवित्र रमजान ईद चे औचित्य साधून महाआरोग्य सर्व रोग निदान शिबिर व भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी सकाळी 9 वाजता करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. हनुमंत किनीकर ,डॉ. शामसुंदर  पाटील, डॉ. रोहन हुडगे नवजात शिक्षु तज्ञ, डॉ. प्रमोद लोकरे, डॉ. स्वाती शेळके, डॉ. श्रीप्रसाद आलोरे दंतरोग तज्ञ, अशा हाबरे व डॉ. हेमंत केंद्रे यांच्या उपस्थितीत रुग्णाची तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. तसेच उदयगिरी लायन्स धर्मदाय नेत्र रुग्णालय उदगीर यांच्या वतीने डोळ्याची तपासणी करण्यात येणार आहे. तरी भादा व परिसरातील रुग्णांनी या भव्य सर्व रोग निदान शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आधार प्रतिष्ठान च्या वतीने प्रशांत पाटील, रियाज खोजे, बालाजी उबाळे, मनोज पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments