माऊली प्रतिष्ठानच्या भजन गायन स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद
औसा प्रतिनिधी
माऊली प्रतिष्ठान औसा व माऊली संगीत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एक व दोन एप्रिल 2023 रोजी येथील श्री मुक्तेश्वर मंदिराच्या दर्शन मंडपामध्ये राज्यस्तरीय भजन गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बालगटातील 45 स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपल्या भजन गायन रसिक स्रोत्यांसमोर सादर केले. रविवार दिनांक 2 एप्रिल रोजी मोठ्या गटातील राज्यस्तरीय भजन गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून पंडित शिव रुद्र स्वामी यांच्या संकल्पनेतून संगीत व भजन गायन क्षेत्रातील कलावंताच्या कलागुणाला वाव मिळावा म्हणून आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य रमेश भुजबळ यांच्या कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर या भजनाने पहिल्या दिवशीच्या सत्राची सांगता झाली यावेळी पंडित शिव रुद्र स्वामी यांनी हार्मोनियम प्रकाश कुलकर्णी यांनी तबला वादनाची साथ संगत केली तसेच नरसिंग राजे कुंभार आणि भाऊसाहेब रायकर यांचे भजन गायन झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज हलकुडे यांनी केले.
0 Comments