एम आय एम  औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांची उमेदवारी अर्ज दाखल

औसा प्रतिनिधी 
आगामी होऊ घातलेल्या औसा बाजार समितीच्या 2023 च्या निवडणुकीत एम आय एम पक्षाच्या वतीने औसा येथील व्यापारी मतदारसंघातून एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी  आज दिनांक 3  एप्रिल सोमवार रोजी  निवडणूक निर्णय अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती औसा तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत औसा येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. सावत्रिक निवडणूक 2023 कृषी उत्पन्न बाजार समिती या व्यापारी मतदारसंघातून एमआयएम पक्षाच्या वतीने सय्यद मुजाफर अली  इनामदार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आणि हि अकरा वर्षानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत आहे. तर या निवडणुकीमध्ये  मागच्या काळात आम्ही अर्ज भरण्याचा प्रयत्न केला होता, पण काही अडचणींमुळे भरता आलेला नाही. तरी यावेळेस आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  व्यापारी मतदारसंघातून अर्ज भरलेला आहे आणि फॉर्म भरण्याचा उद्देश असा आहे. की व्यापा-यांची जी अडीअडचणी आहे ते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांच्या सोडण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न मागेही केलेला आहे आणि पुढे करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण ज्यांनी जे प्रश्न मांडायचे असतात ते कौन्सिल मध्ये मांडावे लागतात यासाठी मी अर्ज दाखल केला आहे. आणि मी सर्व व्यापारी बांधवांना विनंती करत आहे की त्यांनी आम्हाला बहुमताने विजयी करावे जेणेकरून व्यापाऱ्यांची जी समस्या आहेत ती सोडवण्यासाठी मी प्रयत्न शील आहे असे यावेळी एम आय एम चे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी अर्ज दाखल केल्यानंतर ते बोलत होते. वेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना नय्युम पटवेकर, मोहम्मद मुंगले,साबेर इनामदार आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments